शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातील 40 टक्के अंगणवाड्या शौचालयाविना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2018 14:53 IST

स्वच्छ भारत अभियानाखाली संपूर्ण देश उघड्यावरील शौचापासून मुक्त करण्याचा विडा केंद्र सरकारने उचलला असला तरी लहान आकाराच्या विकसित राज्यामध्ये समाविष्ट असलेल्या गोव्यातील 40 टक्के अंगणवाड्यांना  शौचालयाची सोय नसल्याचे शासकीय आकडेवरुनच स्पष्ट झाले आहे.

-सुशांत कुंकळयेकरमडगाव - स्वच्छ भारत अभियानाखाली संपूर्ण देश उघड्यावरील शौचापासून मुक्त करण्याचा विडा केंद्र सरकारने उचलला असला तरी लहान आकाराच्या विकसित राज्यामध्ये समाविष्ट असलेल्या गोव्यातील 40 टक्के अंगणवाड्यांना  शौचालयाची सोय नसल्याचे शासकीय आकडेवरुनच स्पष्ट झाले आहे. एवढेच नव्हे तर 8 टक्के अंगणवाडी केंद्रात पिण्याच्या पाण्याचीही सोय नसल्याचे उघड झाले आहे.महिला व बाल कल्याण खात्याकडून उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार गोव्यातील एकूण 1262 अंगणवाड्यांपैकी 754 (59.74 टक्के) अंगणवाड्यांत शौचालयाची सोय आहे तर 1164 अंगणवाडी केंद्रात पिण्याच्या पाण्याची सोय आहे.

कित्येक अंगणवाडय़ात शौचालयाची सोय नसल्यामुळे या केंद्रात येणा-या मुलांना तसेच काम करणा-या कर्मचा-यांना एकतर उघड्यावर आपल्या विधी कराव्या लागतात किंवा शेजारी जाऊन त्यांच्या शौचालयाचा वापर करण्यासाठी विनंती करावी लागते. 0 ते 6 वर्षापर्यंतची मुले कुपोषणापासून दूर राहावीत या उद्देशाने अंगणवाड्यांची सोय केलेली असली तर या अंगणवाड्या मुलभूत सुविधांपासूनही दूर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

यातील बहुतेक अंगणवाड्या ग्रामीण भागात भाड्याच्या खोलीत चालवल्या जात असून अगदी छोट्या जागेत चालवल्या गेलेल्या या केंद्रांत पिण्याचे पाणी, शौचालय, खेळण्यासाठी जागा तसेच स्वयंपाक घराची सोय नाही. गोव्यात 676 अंगणवाड्या अगदी छोट्या जागेत चालविल्या जात असल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.

73 अंगणवाड्या पंचायतींच्या जागेत किंवा समाज सभागृहात चालू असून फक्त 147 अंगणवाड्या सरकारी इमारतीत चालतात. अंगणवाड्यांसाठी पुरेशी जागा न मिळण्याचे कारण म्हणजे, या योजनेखाली ग्रामीण भागात भाड्यापोटी दरमहा एक हजार तर शहरीभागात चार हजार रुपये एवढे अल्प भाडे दिले जात असल्याने या केंद्रासाठी कुणी जागा द्यायला पुढे येत नाहीत.यावर उपाय म्हणून कित्येक अंगणवाड्या जवळच्या शाळांमध्ये संलग्नीत केल्या आहेत. तर सरकारी आणि पंचायतीच्या जागेत 46 नवीन अंगणवाड्या बांधण्याचा प्रस्ताव सरकारला दिला आहे. एकूण 299 अंगणवाड्या प्राथमिक शाळांना जोडण्यात आलेल्या आहेत. 

टॅग्स :goaगोवा