शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकखाली चिरडून वास्कोत ३७ वर्षीय पादचारी जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 16:44 IST

Goa News: दुर्देवीरित्या मरण पावलेला अमीशेट्टी हा तरुण आंन्द्राप्रदेश येथील आहे. तो गोव्यात रहायचा की नाही याबाबत चौकशी चालू आहे. अपघात केल्यानंतर ट्रकसहीत चालकाने केले पलायन, मात्र नंतर पोलीसांनी गजाआड केले.

लोकमत न्यूज नेटवर्कवास्को: बुधवारी (दि.२३) पहाटे वास्कोच्या टीळक मैदानासमोरील एफएल गोंम्स मार्गावर झालेल्या भिषण अपघातात अमीशेट्टी गीरी नावाच्या ३७ वर्षीय पादचाºयाचा ट्रकखाली चिरडून जागीच अंत झाला. या अपघातात दुर्देवी रित्या मरण पोचलेला अमीशेट्टी हा आंन्द्रप्रदेश येथील मूळ रहीवाशी असून तो गोव्यात कुठे रहायचा याबाबत पोलीस चौकशी करित आहेत.

वास्को पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार बुधवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास सदर अपघात घडला. वास्कोतून मुरगाव बंदराच्या बाजूने माल भरून भरधाव वेगाने जात असलेल्या ट्रकने एफएल गोंम्स मार्गावर अमीशेट्टी याला ठोकर दिल्याने तो ट्रकखाली येऊन चिरडला. ट्रकखाली चिरडलेल्या अमीशेट्टी ला ट्रकने नंतर काही अंतर फरफटत नेल्याने त्याच्या अंगाचे काही भाग वेगळे होऊन तो जागीच ठार झाल्याचे पोलीसांनी सांगितले. या अपघातानंतर ट्रकचालकाने ट्रकसहीत घटनास्थळावरून पलायन केल्याची माहीती पोलीसांनी देऊन नंतर त्याला गजाआड करून अटक केल्याचे सांगितले. तसेच या अपघातातील ट्रकही पोलीसांनी जप्त केला आहे. अटक केलेल्या ट्रक चालकाचे नाव मारुती डोमेरा (महाराष्ट्रा) असे असल्याची माहीती पोलीसांकडून प्राप्त झाली.

बुधवारी पहाटे ट्रकखाली चिरडून मरण पोचलेला अमीशेट्टी अपघाताच्या वेळी रस्ता ओलांडत होता की रस्त्याच्या बाजूने चालत जात होता याची माहीती पोलीसांना मिळालेली नसून त्याबाबत चौकशी चालू आहे. मरण पोचलेल्या अमीशेट्टी याच्या कुटूंबाचा अजून पोलीसांना पत्ता लागलेला नसून तो गोव्यात रहायचा की नाही याबाबतही पोलीस चौकशी करत आहेत. पोलीसांनी या अपघाताचा तसेच मरण पोचलेल्या अमीशेट्टी याच्या मृतदेहाचा पंचनामा करून तो शवगृहात पाठवून दिला आहे. पोलीस या अपघाताचा अधिक तपास करित आहेत. 

टॅग्स :Accidentअपघात