शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

कामाक्षीच्या मानेवर चाकूने केले ३५ वार; संशयी स्वभावामुळे प्रकाश मारहाण करायचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2023 09:45 IST

पर्वरी येथील खून प्रकरण 

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : आपली प्रेयसी आपल्याशी प्रेमसंबंध तोडते आहे, असा संशय आल्यामुळे माथेफिरू प्रियकर फकीर उर्फ प्रकाश चुंचवाडने प्रेयसीच्या मानेवर चाकूचे सपासप ३५ वार करून तिला ठार मारले. तिच्या मृतदेहाच्या वैद्यकीय तपासणी अहवालातून हे उघड झाले आहे. 

कामाक्षीच्या खूनप्रकरणी पोलिसांनी प्रकाशसह त्याच्या मित्राला शुक्रवारी अटक केली. प्रकाश कामाक्षीच्या मृतदेहावर गोवा वैद्यकीय महाविद्यालयात पोस्टमार्टम करण्यात आले. तिच्या मानेवर ३५ जखमा आढळल्या आहेत, तसेच रक्तस्रावामुळे तिचा मृत्यू झाल्याचेही अहवालात म्हटले आहे. 

दोघांचेही प्रेमप्रकरण सुरू होते, असे पोलिस तपासातून उघड झाले आहे, तसेच अलीकडच्या काळात कामाक्षी प्रकाशला टाळण्याचा प्रयत्न करीत होती. त्याच्या लहरी स्वभावाला ती वैतागल्याचेही सांगितले जाते. आपल्याला कामाक्षी टाळत असल्याचे लक्षात आल्यामुळे प्रकाश तिच्यावर संशय येऊ लागला. तिचे दुसऱ्याशी सूत जुळले असावे, असा संशय घेऊन तिला कायमचा संपविण्यासाठी त्याने कट आखला आणि त्याची अंमलबजावणीही केली. पर्वरी येथे तिचा खून करून निरुपडी करकात नावाच्या आपल्या मित्राच्या मदतीने तिचा मृतदेह आंबोली घाटात नेऊन टाकला होता. कामाक्षी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या कुटुंबीयांनी नोंदविल्यानंतर तपास सुरू झाला आणि या खुनाचा छडा लागला.

खुनानंतर एक दिवस विचारात

प्रकाशविरोधात तक्रार केल्यानंतर कामाक्षी रात्री थेट आपल्या पर्वरी येथील फ्लॅटवर आली. तिच्यापाठोपाठ प्रकाशही आला. यावेळी दोघांत जोरदार भांडण झाले आणि तेव्हाच तिचा खून करण्यात आल्याचे बोलले जात आहे. बुधवारी दिवसभर प्रकाशने मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची, यासाठी वेळ घेतल्याचे सांगितले जात आहे.

संशयी स्वभाव

प्रकाशच्या लहरी स्वभावाला कामाक्षी कंटाळली होती. आपल्या एका मित्रासोबत तिचे सूत जुळल्याचा त्याला संशय होता, यातूनच तो तिला त्रास द्यायचा. कामाक्षी कोणासोबतही बोलली, तरी प्रकाश तिला मारहाण करत असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. 

टॅग्स :goaगोवाCrime Newsगुन्हेगारी