शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

एटीएम मशीनमध्ये घालण्यासाठी नेलेले ३५ लाख बँक अधिकाऱ्याकडून हडप

By वासुदेव.पागी | Updated: March 6, 2024 17:18 IST

हा कारनामा करणाऱ्या बँक अधिकाऱ्याचे नाव हिंद दीप वालिया असे असून तो कॅनरा बँकच्या आगशी शाखेत एक अधिकारी आहे.

पणजी: एटीएममशीनमध्ये घालण्यासाठी नेलेल्या पैशांतील ३५ लाख रुपये स्वत:च हडप करण्याचा प्रकार कॅनरा बँकमधील एका अधिकाऱ्याकडून क रण्यात आला आहे. या प्रकरणात आगशी पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीसांनी हिंद दीप वालिया याला अटक केली आहे. 

हा कारनामा करणाऱ्या बँक अधिकाऱ्याचे नाव हिंद दीप वालिया असे असून तो कॅनरा बँकच्या आगशी शाखेत एक अधिकारी आहे. तो मूळचा पंजाब येथील असून बँकमधील नोकरीमुळे तो गोव्यात राहत होता. वास्तविक एटीएममशीनमध्ये पैसे घालण्याची जबाबदारी ही त्याची नव्हती, परंतु त्याला ते काम करण्याची खूप इच्छा होती. ४ मार्च रोजी सकाळी पाउणेदहा वाजण्याच्या सुमारास तो एटीएम मशीनमध्ये पैसे घालण्यासाठी गेला होता. मात्र त्याने जी रोखड नेली होती ती आगशी येथील पूर्ण रक्कम एटीएममध्ये घातलीच नाही.त्यात ३५  लाख रुपये कमी घालण्यात आल्याचे लक्षात आल्यामुळे बँकेच्या स्थानिक शाखेकडून ही माहिती पणजी येथील विभागीय कार्यालयात कळविली. कॅनरा बँकच्या विभागीय शाखेचे सहाय्यक महाव्यवस्थापक आर गणेश यांनी आगशी पोलीस स्थानकात या विषयी तक्रार नोंदविली. पोलिसांनी या प्रकरणात हिंद दीप वालिया याच्या विरुद्ध फसवणुकीचा आणि चोरीचा गुन्हा नोंदविला असून त्याला अटकही करण्यात आली आहे.

टॅग्स :goaगोवाCrime Newsगुन्हेगारी