शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

प्रगतशील सासष्टीत अजुनही 3,361 घरे शौचालयाविना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 3:21 PM

2018च्या अखेरीस गोवा राज्य हगणदारी मुक्त करण्याचे उद्दिष्ट राज्य सरकारने डोळ्यासमोर ठेवले आहे.

मडगाव -  2018च्या अखेरीस गोवा राज्य हगणदारी मुक्त करण्याचे उद्दिष्ट राज्य सरकारने डोळ्यासमोर ठेवले आहे. गोव्यातील सर्वात प्रगतशील तालुका मानला जाणाऱ्या सासष्टीतच अद्याप 3361 घरांना शौचालयाची सोय नसल्याचे सरकारी आकडेवारीतूनच उघड झाले आहे.  ही आकडेवारी सरकारी असल्याने प्रत्यक्षातील स्थिती याही पेक्षा भयानक असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सासष्टी हा गोव्यातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला तालुका असून पर्यटन उद्योगामुळे त्याचा पुढारलेल्या तालुक्यात समावेश होतो. या तालुक्यातील लोकांचे दरडोई उत्पन्न चांगले असूनही शौचालयाबाबतची या भागातील परिस्थिती चिंता करण्यासारखीच आहे. 

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतर्फे हल्लीच या तालुक्याचे सर्वेक्षण केले असता या तालुक्यातील 42719 घरांपैकी  39358 घरांना शौचालयाची सोय असल्याचे दिसून आले.  मात्र अजुनही 3361  घरांना शौचालयाची सोय नसल्यामुळे  ते उघडय़ावर शौच करीत असल्याचे दिसून आले आहे.  सासष्टी तालुक्यात  एकूण तीस गावांचा समावेश होतो. त्यापैकी केवळ रुमडामळ दवर्ली  पंचायत क्षेत्रतच सर्व घरांना शौचालयाची सोय असल्याचे या सर्वेक्षणातून पुढे आले आहे.

या सर्वेक्षणातून जी माहिती पुढे आली आहे. त्यानुसार नुवे पंचायत क्षेत्रात 325 तर वेळळी पंचायत क्षेत्रात 294 घरांना शौचालयाची सोय नाही.  किनारपट्टी भागात असलेल्या काना बाणावली या पंचायत क्षेत्रात 258 घरे शौचालयाशिवाय आहेत. याशिवाय लोटली येथे 240, चिंचोणो-देवसा येथे 197, पारोडा येथे 146, राय येथे 145 तर कुडतरी येथे 143 घरांना शौचालयाची सोय नाही.

येत्या शंभर दिवसांत  या 3361  घरांना शौचालयाची सोय उपलब्ध करुन देण्यास राज्य सरकारला शक्य होणार का? या संबंधी गटविकास अधिकारी अमितेश शिरवईकर यांची प्रतिक्रिया विचारली असता, जर शौचालय बांधण्यासाठी जागा मिळाल्यास आणि त्या जागेविषयी कुठलीही कायदेशीर अडचण नसल्यास  हे उदिदष्ट पूर्ण करणे फारसे कठीण होणार नाही. जर काही ठिकाणी  जागा मिळाली नाही तर सामुदायिक शौचालये बांधून  ही समस्या सोडवता येणे शक्य आहे असे ते म्हणाले.  

टॅग्स :goaगोवा