शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अर्थसंकल्पात ३३ टक्के निधी केवळ महिलांसाठीच राखीव: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 07:22 IST

कांपाल येथे आयोजित 'सरस २०२६'च्या समारोप सोहळा रविवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडला.

लोकमत न्यूज नेटवर्क,  पणजी: 'राज्याच्या अर्थसंकल्पातील ३३ टक्के निधी केवळ महिलांच्या विकासासाठी खर्च करण्याची तरतूद करण्यात आली आहे. केंद्र सरकारनंतर महिलाकेंद्रित अर्थसंकल्प सादर करणारे राज्य म्हणून गोव्याने पुढाकार घेतला आहे. प्रत्येक खात्याला महिलांसाठी स्वतंत्र कार्यक्रम राबवण्यासाठी निधी देण्यात आला असून त्यामध्ये महिला व बालविकास खाते, समाजकल्याण खाते, ग्रामीण विकास तसेच शिक्षण खाते यांचा प्रामुख्याने समावेश आहे' अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

कांपाल येथे आयोजित 'सरस २०२६'च्या समारोप सोहळा रविवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी व्यासपीठावर सरकारचे सल्लागार राजेश कुलकर्णी, ग्रामीण विकास खात्याचे संचालक प्रेमराज शिरोडकर, कार्यक्रम संचालक दीपाली नाईक, गौरीश धोंड आदी उपस्थित होते. 

मुख्यमंत्री म्हणाले की, 'राज्य सरकारने महिला सशक्तीकरणावर नेहमीच विशेष भर दिला आहे. राज्यातील महिलांमध्ये विशेषतः ग्रामीण भागातील महिलांमध्ये मोठी क्षमता आहे.

५०० कोटींच्या उलाढालीचे लक्ष्य

ग्रामीण विकास खात्यामार्फत विविध योजना महिलांपर्यंत पोहोचविण्यासाठी मोठे काम केले जात असून त्यांच्या स्वयं-सहाय्यता गटांमध्ये सध्या सुमारे ४८ हजार महिला कार्यरत आहेत. हा आकडा एक लाख महिलांपर्यंत नेण्याचे आणि पाचशे कोटींची वार्षिक उलाढाल करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.

महिलांसाठी सीएम रोजगार योजना

मुख्यमंत्री म्हणाले की, 'महिलांना स्वतःचा व्यवसाय उभारण्यासाठी राज्य सरकारने सीएम रोजगार योजना सुरू केली असून या योजनेअंतर्गत २ ते ६ टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. पीएम सूर्य घर योजनेंतर्गत घरांच्या छतांवर सौर पॅनल बसविण्यासाठी कमी दरात सुविधा दिल्या जात आहेत. याचा फायदा सर्वांनी घ्यावा. तरच गॅसचा वापर कमी होईल आणि वीज बिलदेखील कमी येणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Goa Budget: 33% Funds Reserved Exclusively for Women, Says CM Sawant.

Web Summary : Goa earmarks 33% of its budget for women's development, a pioneering move after the central government. CM Sawant highlights initiatives like CM Rojgar Yojana for women entrepreneurs and solar panel subsidies, aiming to empower women and boost rural economies with self-help groups.
टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत