शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

सरत्या वर्षात गोव्यात रस्त्यांवरील अपघाती बळींची संख्या 320

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2017 17:12 IST

2017 साल संपायला केवळ एक दिवस बाकी असताना गोव्यातील रस्ता अपघातातील बळींची संख्या 320 वर पोचली आहे

सुशांत कुंकळयेकरमडगाव : 2017 साल संपायला केवळ एक दिवस बाकी असताना गोव्यातील रस्ता अपघातातील बळींची संख्या 320 वर पोचली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण जरी 16 बळींनी कमी असले तरी आजची 31 डिसेंबरची रात्र वै:याची ठरु नये यासाठी डोळ्यात तेल घालून जागरुक रहाण्याची गरज आहे.29 डिसेंबर्पयतच्या आंकडेवारीप्रमाणो गोव्यात 294 जीवघेणो अपघात झाले असून त्यात 320 जणांना मृत्यू आला आहे. 2016 साली रस्त्यावर मृत्यू येणा:यांचे प्रमाण 336 होते. त्यामुळे मागच्यावर्षीच्या तुलनेत यंदाचे वर्ष काहीसे चांगलेच म्हणावे लागणार आहे.वाहतूक खात्याचे पोलीस अधीक्षक दिनराज गोवेकर यांच्याशी संपर्क साधला असता, 31 डिसेंबरच्या रात्री गोव्यात कुठलेही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी रस्त्यावर जादा प्रमाणात वाहतुक पोलीस तैनात केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. विश्ोषत: कळंगूट, अंजुणा या भागात पर्यटकांची संख्या जास्त असते हे लक्षात धरुन वाहतुकीची कुठलीही समस्या निर्माण होऊ नये यासाठी किनारपट्टी भागात अधिक पोलीस तैनात केले आहेत. याशिवाय मांडवी व जुवारी पुलावरही अधिक पोलीस तैनात केले जातील असे त्यांनी सांगितले.यंदा दरवर्षीप्रमाणो सर्वात अधिक अपघाती मृत्यू मोटरसायकल स्वारांचे झाले असून यंदा ही संख्या 190 वर पोचली आहे. मागच्यावर्षी हे प्रमाण केवळ 164 होते. या मोटरसायकलच्या मागे बसलेल्यांना अपघातात मृत्यू येण्याचे प्रमाण 37 असून मागच्यावर्षीही एवढय़ाच लोकांना मृत्यू आला होता. त्याशिवाय इतर 20 वाहन चालकांना मृत्यू आला असून वाहनांतील इतर प्रवाशांच्या मृत्यूची संख्या 15 आहे.यंदाची आणखी एक डोकेदुखी म्हणजे पादचा:यांच्या मृत्यूचे प्रमाण वर्ष संपायला दोन दिवस बाकी असताना एकूण 46 पादचा:यांना मृत्यू आला असून मागच्यावर्षीच्या तुलनेत हे प्रमाण चारनी कमी आहे. इतर मृत्यूमध्ये 9 सायकलस्वार व तीन इतरांचा समावेश आहे.मागच्या वर्षीच्या तुलनेत यावेळी जरी अपघाती मृत्यूचे प्रमाण कमी असले तरी लहानशा गोव्यात एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर होणारे अपघाती मृत्यू ही चिंतेचीच बाब असल्याचे मत गोवा कॅनचे रोलंड मार्टिन्स यांनी व्यक्त केले. विशेषत: पादचा:यांचे मृत्यू ही अधिक चिंताजनक बाब असल्याचे ते म्हणाले.

2017 तील अपघातातील मृत्यूएकूण जीवघेणो अपघात 294दुचाकी चालक 190दुचाकीच्या मागे बसलेले 037इतर वाहन चालक 020पादचारी 046प्रवासी 016सायकलस्वार 009इतर 003