शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

काय करायचेय ते खुशाल करा; आम्ही निर्णयावर ठाम, चिंबलवासीयांचा २६व्या दिवशी निर्धार कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 07:24 IST

सरकारवर जोरदार टीका

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : युनिटी मॉल व प्रशासन स्तंभ प्रकल्पाच्या विरोधात चिंबलवासीय ठाम आहेत. आम्ही अद्याप उपोषण, धरणे आंदोलन बंद केलेले नाही. सरकारने आम्हाला दोनवेळा केवळ दिशाभूल करण्यासाठी बोलावले आणि फसवले. पण आता आम्ही मुख्यमंत्र्यांकडे जाणारच नाही. सरकारला जे काय करायचे आहे ते सरकारला करु दे. आम्ही देखील आता आम्हाला जे हवे तेच करणार आहोत, असा ठाम निर्णय चिंबलवासियांनी घेतला आहे.

कदंब पठारावर युनिटी मॉल व प्रशासन स्तंभ प्रकल्पाच्या विरोधात चिंबलवासियांनी उपोषण, धरणे आंदोलन सुरुच ठेवले आहे. गुरुवारी या आंदोलनाचा २६वा दिवस आहे. यावेळी दररोज येथे स्थानिक महिला, युवक, ज्येष्ठ व्यक्ती आपली उपस्थिती लावतात. तसेच त्यांच्यासोबत आंदोलनाचे नेतृत्व करणारे गोविंद शिरोडकर व अजय खोलकर देखील यावेळी पूर्णवेळ असतात. दरम्यान, गुरुवारी गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई यांनी पुन्हा एकदा पाठिंबा दर्शवला आहे.

सरकारने केली दिशाभूल

अजय खोलकर म्हणाले, आता आम्ही आंदोलन अधिक तीव्र करणार आहोत. मुख्यमंत्र्यांनी दोनवेळा आम्हाला चर्चेसाठी बोलावले. त्यामुळे आम्ही मोठ्या अपेक्षेने त्यांच्याकडे जात चर्चा केली. पण त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालाच नाही. आम्ही चलो विधानसभा बॅनर अंतर्गत विधानसभेवर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला, पण आम्हाला मेरशी जंक्शनजवळ अडविण्यात आले. आम्ही जेव्हा मुख्यमंत्र्यांनी आम्हाला भेटायला यावे, असा आग्रह धरला तेव्हा ते आले, पण ठोस आश्वासन दिले नाही. पण आता आम्ही शांत बसणार नाही, असेही ते म्हणाले.

निर्णय घेतले, दोन दिवसांत कळवू

आंदोलनाच्या पुढील नियोजनाबाबत बोलताना खोलकर यांनी सांगितले की, एकतर आता आम्ही ठरविले आहे की, मुख्यमंत्र्यांना भेटायला किंवा चर्चेसाठी जाणार नाही. आम्ही ग्रामस्थांशी बोलून काही ठोस निर्णय घेतलेले आहेत. हे निर्णय नेमके कुठले? ते येत्या दोन ते तीन दिवसात सरकारला कळणार आहोत. आम्ही आत्ताच यावर काहीच बोलणार नाही. 

English
हिंदी सारांश
Web Title : Chimbale residents firm on decision against Unity Mall project.

Web Summary : Chimbale residents are steadfastly opposing the Unity Mall project. Talks with the government have failed, and protests continue. Future actions will be revealed soon, intensifying the movement against the project.
टॅग्स :goaगोवाState Governmentराज्य सरकारPoliticsराजकारण