शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

टँकर - दुचाकी अपघातात २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2020 19:16 IST

‘झुआरी इंडीयन आॅईल टँकींग लिमिटेड’ च्या बाहेरील चौपदरी महामार्गावर टँकर व दुचाकीत झालेल्या भीषण अपघातात २३ वर्षीय संदीप शर्मा या तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

वास्को  - सोमवारी (दि.२९) सकाळी दक्षिण गोव्यात असलेल्या ‘झुआरी इंडीयन आॅईल टँकींग लिमिटेड’ च्या बाहेरील चौपदरी महामार्गावर टँकर व दुचाकीत झालेल्या भीषण अपघातात २३ वर्षीय संदीप शर्मा या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. संदीप ‘केटीएम’ मोटरसायकल वरून  कामावर जाण्यासाठी भरधाव वेगाने जात असताना त्यांने ‘झुआरी इंडीयन आॅईल टँकींग लिमिटेड’ कंपनीत जात असलेल्या टँकरच्या दाव्या बाजूतील पुढच्या चाकाला जबर धडक दिल्यानंतर त्याचा जागीच मृत्यू झाला.

वेर्णा पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार सोमवारी सकाळी ७.१५ च्या सुमारास सदर अपघात घडला. दाबोळी येथे राहणारा संदीप शर्मा वेर्णा औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत कामाला असल्याची माहीती पोलीसांनी दिली. सकाळी कामावर जाण्यासाठी तो आपल्या घराकडून ‘केटीएम’ दुचाकीने (क्र: जीए ०६ व्हाय ६०९४) निघाला होता. संदीप साकवाळ येथील ‘झुआरी इंडीयन आॅईल टँकींग लिमिटेड’ च्या बाहेरील चौपदरी महामार्गावर पोचला असता याचवेळी वेर्णा महामार्गावरून या कंपनीत आत जाण्यासाठी एका टँकरने वळण घेऊन सदर टँकर कंपनीच्या गॅटसमोर पोचला होता. भरधाव वेगाने जात असलेल्या संदीपला त्याच्या दुचाकीवर ताबा आणण्यास अपयश आल्याचे पोलीसांना तपासात जाणवल्याची माहीती सूत्रांनी देऊन त्यांने त्याच्या दुचाकीची समोरून त्या टँकरच्या पुढच्या बाजूच्या डाव्या चाकाला जबर धडक दिली. दुचाकीने जात असलेल्या संदीपने हेल्मेट घातले होते अशी सूत्रांनी दिली, मात्र टँकरला धडक दिल्यानंतर त्याचे डोके जोरात टँकरला आपटून तो रस्त्यावर खाली कोसळला. 

सदर अपघाताची माहीती मिळाल्यानंतर १०८ च्या रुग्णवाहीकेने त्वरित घटनास्थळावर दाखल होऊन बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या संदीपला उपचारासाठी चिखली येथील उपजिल्हा इस्पितळात नेले. अपघातानंतर संदीपला इस्पितळात आणण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे चिखली उपजिल्हा इस्पितळातील डॉक्टरांनी येथे घोषित केल्याची माहीती वेर्णा पोलीसांनी दिली. वेर्णा पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक प्रवीण सिमेपुरुस्कर यांनी मयत संदीप याच्या मृतदेहाचा पंचनामा केल्यानंतर शवचिकित्सेसाठी पाठवून दिला. वेर्णा पोलीस सदर अपघाताचा अधिक तपास करीत आहेत.

 

टॅग्स :Accidentअपघातgoaगोवा