शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
3
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
4
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
5
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
6
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
7
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
8
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
9
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
10
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
11
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
12
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
13
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
14
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
15
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
16
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
17
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
18
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
19
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
20
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार

अनुवांशिक रोगांसाठी २ हजार शिशुंच्या चाचण्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 16:38 IST

संभाव्य अनुवांशिक व पचनक्रियेशी संबंधित  रोगांचे निदान करणा-या नवजात शिशुंच्या चाचण्या गोमेकॉत पुन्हा स ुरू केल्यापासून आतापर्यंत २ हजार नवजात अर्भकांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. 

 पणजी - संभाव्य अनुवांशिक व पचनक्रियेशी संबंधित  रोगांचे निदान करणा-या नवजात शिशुंच्या चाचण्या गोमेकॉत पुन्हा स ुरू केल्यापासून आतापर्यंत २ हजार नवजात अर्भकांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. 

 गेल्या तीन महिन्यात दोन हजार नवजात अर्भकांची  रस्तचाचणी घेण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिली आहे. बंगळूरस्थीत निओ जन लॅब या संस्थेकडून या चाचण्या केल्या जात आहेत.  गोमेकॉत जन्माला आलेल्या अर्भकांच्या रक्ताचे नमुने गोळा करून ते बंगळूरला पाठविले जातात. नमुने घेऊन पाठविण्याचे  कामही या संस्थेचे कर्मचारीच करीत आहेत.  चाचणी अहवाल हे बंगळूरहून पाठविले जातील. पैकी अनेक चाचणी अहवाल मिळालेही आहेत. नवजात अर्भकांचे रक्ताचे नमुने काढून घेऊन त्याची अनेक प्रकारच्या चाचण्या घेण्यात येतात.  बहुतेक चाचण्या या मज्जा व पचन संस्थेसंबंधी असतात.  एखाद्या अर्भकात कोणताही दोष आढळल्यास त्यावर त्वरित उपचार करणे सोपे होईल या उद्देशाने ही सुविधा देण्यात आली आहे.  यापूर्वीही विश्वजित राणे आरोग्यमंत्री असताना ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. याच संस्थेशी सरकारने करार केला होता. भाजप सरकारच्या काळात लक्ष्मीकांत पार्सेकर आरोग्यमंत्री असताना ही सुविदा बंद करण्यात आली होती. ही सुविधा फार खर्चिक आहे आणि चाचणीतून अगधीच नगण्य अहवाल पॉझिटीव्ह येत आहेत असा दावा त्यावेळी सरकारकडून करण्यात आला होता. परंतु राणे पुन्हा आरोग्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा त्याच संस्थेशी करार करून चाचण्या पुन्हा सुरू करण्यात आल्या.

टॅग्स :Healthआरोग्यgoaगोवा