शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातील किनाऱ्यांवरुन सोळा महिन्यांच्या काळात उचलला २0 लाख किलो कचरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2018 19:15 IST

गोव्यातील किनाऱ्यांवरुन गेल्या सोळा महिन्यांच्या काळात तब्बल २0 लाख किलो कचरा उचलण्यात आल्याचा दावा केला जात आहे.

पणजी : गोव्यातील किनाऱ्यांवरुन गेल्या सोळा महिन्यांच्या काळात तब्बल २0 लाख किलो कचरा उचलण्यात आल्याचा दावा केला जात आहे. गेल्या जानेवारीपासून कचऱ्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे. किनाऱ्यांवरील कचरा उचलण्याचे काम दृष्टी लाइफ सेविंग कंपनीकडे दिले असून या कपंनीने या सेवेचे १६ महिने पूर्ण केले. किनाऱ्यांवर जीवरक्षकाचे काम करणाऱ्या या कंपनीला १७ डिसेंबर २0१६ रोजी कचरा उचलण्याचे काम दिले होते. किनाऱ्यांवर येणाऱ्या पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणात कचऱ्याची निर्मिती होते. १७ डिसेंबर २0१६ ते १५ एप्रिल २0१८ या कालावधीत १९ लाख ९0 हजार २५0 किलो कचरा उचलल्याचे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवी शंकर यांनी सांगितले. गेल्या तीन महिन्यांच्या काळातच तब्बल १ लाख ८९ हजार ९६८ किलो कचरा गोळा करण्यात आला. गेल्या वर्षी याच तीन महिन्यांच्या काळात २ लाख ६७ हजार ४७ किलो कचरा गोळा करण्यात आला होता. या वर्षी पहिल्या तिमाहीत तिपटीने कचरा वाढल्याचे स्पष्ट होते. एका प्रश्नावर शंकर म्हणाले की, शॅकमालक आता कचऱ्याच्या बाबतीत गांभीर्य दाखवून सहकार्य करु लागले आहेत. गेला काही काळ ओला आणि सुका कचरा वेगळा काढण्याबाबत त्यांना मार्गदर्शनही करण्यात आले. कचरा वाढण्याचे दुसरे एक कारण म्हणजे समुद्राच्या भरतीच्यावेळी समुद्रातून वाहत आलेला कचरा किनाऱ्याला लागतो. खराब हवामानाच्या काळात हा प्रकार सर्रास दिसून येतो. 

कचऱ्याबाबत खाते गंभीरच : बाबू आजगांवकर पर्यटनमंत्री बाबू आजगांवकर म्हणाले की, गेले वर्षभर कंपनीच्या कामावर आम्ही बारकारईने नजर ठेवून आहोत. कचरा उचलण्याच्या कामात कोणतीही कसूर ठेवता कामा नये, असा इशारा वेळोवेळी आम्ही दिलेला आहे त्यामुळे कामही चांगल्या पध्दतीने चालले आहे. देश, विदेशातून येणाºया पर्यटकांना किनारे स्वच्छ मिळायला हवेत, ही आमची भूमिका आहे. कोठेही कचरा दिसल्यास फोटो काढून वॉटसअपवर पाठवल्यास २४ तासांच्या आत कारवाई केली जाते. त्यामुळे लोकांनीही सहकार्य करायला हवे.