पणजी : राज्यातील अभयारण्यांपासून एक किलोमीटरच्या संरक्षित क्षेत्रात असलेल्या १८ खनिज खाणींचे पर्यावरणविषयक दाखले रद्द केले जातील, असे केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. मंत्रालयाने गोव्यातील ७२ खाणींना पर्यावरण दाखले (ईसी) देण्याचा जो निर्णय घेतला आहे, त्या निर्णयाची लेखी प्रत शनिवारी जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील खनिज खाणींना एकूण ९ अटी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने घालून दिल्या आहेत. मंत्रालयाच्या सूचना व निर्णयांच्या प्रतीवर संशोधक डॉ. यू. श्रीधरन यांची सही आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने आपल्या निर्णयाची व सूचनांची प्रत २० मार्च २०१५ ही तारीख घालून गोवा सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाच्या प्रधान सचिवांना स्पीड पोस्टद्वारे पाठवली आहे. लोकमतला ही प्रत उपलब्ध झाली आहे. गोवा सरकारने एकूण ८८ खनिज लिजांचे नूतनीकरण केले आहे. त्यापैकी ७२ लिजांना पर्यावरण दाखले दिले जातील म्हणजेच २०१२ साली लागू झालेले दाखल्यांचे निलंबन मागे घेतले जाईल, असे केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश (पान २ वर)
१८ खाणींचे पर्यावरण दाखले रद्द
By admin | Updated: March 22, 2015 01:17 IST