लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : 'मुलांना लहानपणीच वाचनाची सवय लागावी म्हणून 'इ वाचनालय' सुविधा विकसित केली जात आहे. यावर विविध प्रकारचे बालसाहित्य एका क्लिकवर उपलब्ध असेल. सगळ्यांच्याच घरी अभ्यासासाठी पूरक व पोषक वातावरण नसते. यासाठी विद्यार्थ्यांनी ई वाचनालयाचा पुरेपूर वापर करून घ्यावा. त्यांच्यासाठी आणखी सुविधा निश्चित निर्माण करू. दररोज रात्री दहा वाजेपर्यंत इ वाचनालये खुली असतील' अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली. कला व संस्कृती खाते, इन्फोटेक कॉर्पोरेशन ऑफ गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या इ वाचनालय लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. राज्यात १६८ इ वाचनालये सुरू केली जातील. आतापर्यंत २० वाचनालयांचे लोकार्पणसुद्धा झाले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
यावेळी नगराध्यक्ष वीरेंद्र ढवळीकर, सरपंच नावेद तहसीलदार, राजीव गांधी कला मंदिराचे अध्यक्ष नगरसेवक रितेश नाईक, नगरसेवक आनंद नाईक, रूपक देसाई, शौनक बोरकर, गीताली तळावलीकर, वेदिका वळवईकर, पालिका मुख्याधिकारी हेमनाथ खोर्जुवेकर, कला व संस्कृती खात्याचे सचिव संतोष सुखदेवा आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, 'आजच्या आधुनिक युगात ई वाचनालये ही संकल्पना महत्त्वाचा दुवा ठरू लागलेली आहेत. युवक व विद्यार्थ्यांनी या वाचनालयाचा लाभ करून घ्यावा. रात्री उशिरापर्यंत वाचनालये कार्यरत ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी याचा पुरेपूर वापर करून व घ्यावा. प्रत्येक ग्रामपंचायत नगरपालिका क्षेत्रात किमान एक 'इ वाचनालय' उभे राहील. त्यासाठी पंचायतींचे सहकार्य तेवढेच गरजेचे आहे. त्यांनी पुढाकार घेतल्यास इतर सोपस्कार संबंधित खात्यांकडून पूर्ण करून घेऊ.
कला व संस्कृती खात्याचे संचालक विविध नाईक यांनी प्रास्ताविक केले. इ वाचनालयाची संकल्पना राबविणारे अभियंते रुद्रेश कामत यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कामत यांनी या कामासाठी मिळालेले शुल्क वाचनालय विकासासाठी परत करत असल्याची घोषणा केली.
आधुनिकीकरण करू
'वाचनालये आधुनिक केली जात असली तरी ज्येष्ठ नागरिकांसाठी वर्तमानपत्रे व इतर साहित्य वाचन करण्यासाठी पूर्वीच्या वाचनालयांचे सुशोभीकरण करण्यात येईल. संपूर्ण वातानुकूलित यंत्रणा बसवण्यात येईल. एका महिन्याच्या आत वाचनालयाचेसुद्धा लोकार्पण करण्यात येईल' असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. भविष्याचा वेध घेत सरकार काम करीत आहे, असे ते म्हणाले.
पंचायतींनी पुढाकार घ्यावा
मुख्यमंत्री म्हणाले की, ज्या शाळा बंद पडल्या आहेत, त्या शाळांमधून 'ई वाचनालय' सुरू करणे सहज शक्य आहे. त्यासाठी पंचायतींनी पुढाकार घ्यावा. ग्रामीण भागात 'इ वाचनालय' चळवळ जोमात सुरू राहावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निधी उपलब्ध करून दिल्यामुळेच 'इ वाचनालये' सुरू केली जात आहेत.'
मुख्यमंत्री म्हणाले की, रस्ते, गटार, वीज या सुविधा पुरविल्या म्हणजे विकासाचे ध्येय गाठले असे होत नाही. तळागाळातील प्रत्येक मनुष्याचा ज्यावेळी विकास होईल, त्याचवेळी त्या विकासाला अर्थ आहे. त्यासाठीच ग्रामीण भागातील प्रत्येक मूल ज्ञानाबाबत स्वावलंबी होण्यासाठी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ज्ञानाची भांडारे खुली करत आहोत. त्या माध्यमातून विकसित भारत २०४७ हे स्वप्न सत्यात उतरणार आहे.'
नगराध्यक्ष वीरेंद्र ढवळीकर म्हणाले की, स्व. रवी नाईक यांचा वारसा पुढे घेऊन जाताना मुख्यमंत्री सावंत यांच्या सहकार्याने आम्ही फोंड्यात प्रकल्प पूर्ण करण्याचा धडाका लावला आहे.'
Web Summary : Goa to launch 168 e-libraries, Chief Minister Sawant announced. These libraries aim to cultivate reading habits in children and provide access to digital resources. They will be open until 10 PM, supporting students, especially those preparing for competitive exams. Panchayats are urged to help establish these libraries in their areas.
Web Summary : गोवा में 168 ई-लाइब्रेरी खुलेंगी, मुख्यमंत्री सावंत ने घोषणा की। इन पुस्तकालयों का उद्देश्य बच्चों में पढ़ने की आदतें विकसित करना और डिजिटल संसाधन प्रदान करना है। वे रात 10 बजे तक खुले रहेंगे, छात्रों, विशेष रूप से प्रतियोगी परीक्षाओं की तैयारी करने वालों का समर्थन करेंगे। पंचायतों से इन पुस्तकालयों को अपने क्षेत्रों में स्थापित करने में मदद करने का आग्रह किया गया है।