शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातील १४ आजी- माजी आमदारांच्या ‘आरोग्या’वर तब्बल ५२ लाख रुपये खर्च

By किशोर कुबल | Updated: October 8, 2023 12:46 IST

दोन वर्षात १२ आमदारांनी २ टक्के अल्पव्याजी कर्जाने खरेदी केल्या आलिशान मोटारी

किशोर कुबलपणजी : गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यापासून माजी आमदार कार्लुस आल्मेदांपर्यंत १४ आजी- माजी आमदारांच्या वैद्यकीय उपचारांवर सरकारी तिजोरीतून गेल्या दोन वर्षांच्या काळात तब्बल ५१  लाख ९४ हजार खर्च करण्यात आले. तर १२ आमदारांनी दोन टक्के अल्पव्याजी कर्जाने महागड्या मोटारी खरेदी केल्या.

विधिमंडळ खात्याकडून आरटीआय अर्जाला मिळालेल्या उत्तरातून ही माहिती प्राप्त झाली आहे. वास्कोचे माजी आमदार कार्लुस आल्मेदा यांच्या ‘आरोग्या’वर सर्वाधिक २० लाख ३१ हजार ६६० रुपये खर्च करण्यात आले. त्या पाठोपाठ माजी मुख्यमंत्री तथा ज्येष्ठ आमदार दिगंबर कामत यांनी वैद्यकीय खर्चाचा ८ लाख ३६ हजार ८२७ रुपयांचा परतावा घेतला. हळदोणे मतदारसंघात प्रथमच निवडून येऊन आमदार बनलेले अॅड. कार्लुस फेरेरा यांनी १,६१० रुपयेदेखील वैद्यकीय खर्चाचा परतावा घेतला. स्वत: व्यवसायाने डॉक्टर असलेले डिचोलीचे आमदार चंद्रकांत शेट्ये यांनी १५,०१६ रुपये परतावा घेतला.         आमदारांवर किती खर्च !आलेक्स सिक्वेरा :  ३,०२,६९२ रुपयेआंतोनियो वास    :  १,२२,८४१ रुपयेकार्लुस फेरेरा       :       १,६१० रुपयेचंद्रकांत शेट्ये      :     १५,०१६ रुपयेदिगंबर कामत      :   ८,३६,८२७ रुपयेदयानंद सोपटे      :   ४,४८,५८० रुपयेगोविंद गावडे        :   १,३०,०७४ रुपयेइजिदोर फर्नांडिस  :   २,३३,१२४ रुपयेकार्लुस आल्मेदा     :  २०, ३१,६६० रुपयेकेदार नाईक          :    २,१५,३५४ रुपयेराजेश पाटणेकर     :    ३, ५२,७१२ रुपयेरमेश तवडकर        :         ६८,२९७ रुपयेविजय सरदेसाई     :      ३,५५,१४८ रुपयेविल्फ्रेड डिसा        :         ८०,६७० रुपयेगोव्याच्या आमदारांना महागड्या मोटारींचाही सोस आहे. दोन वर्षात सरकारकडून २ टक्के अल्प व्याजाने मिळणाय्रा कर्जाचा लाभ तब्बल १२ आमदारांनी घेतला. यापैकी ११ आमदारांनी कमाल १५ लाख रुपये कर्ज उचलले. उपसभापती जोशुआ डिसोझा यांनी गेल्या फेब्रुवारीत बीएमडब्ल्यु एम३४० एक्स ड्राइव्ह ही महागडी कार खरेदी केली. १५ लाखांपेक्षा जास्त रक्कम असल्याने उर्वरित व्यवस्था त्यांनी स्वत: केली. कार्लुस फेरेरा यांनी फॅार्च्युनर लिजेंडर ही डिझेलवरील मोटार खरेदी केली. नव्यानेच आमदार बनलेले आरजीचे वीरेश बोरकर यांनी टाटा सफारी खरेदी करण्यासाठी गेल्या मे महिन्यात सरकारी अल्पव्याजी कर्ज उचलले.             कोणकोणत्या मोटारी!

आलेक्स सिक्वेरा : इनोव्हा क्रीटा (डिझेल)वीरेश बोरकर       : टाटा सफारीक्रुझ सिल्वा         : स्कॉर्पिओवेंझी व्हिएगश     :  एमजी ॲस्टर सॅवी कटसंकल्प आमोणकर  : नेक्सन इव्ही मॅक्सकार्लुस फेरेरा          : फॅार्च्युनर लिजेंडरराजेश फळदेसाई    :  मारुती सुझुकी ग्रॅण्ड विताराप्रवीण आर्लेकर       :  थार डिझेल एलएक्सजीत आरोलकर      : क्रेटा १.५ सीआरडीआयजोशुआ डिसोझा    : बीएमडब्ल्यु एम ३४० एक्सविजय सरदेसाई     : किया कार्निव्हलरमेश तवडकर        : किया कार्निव्हलदरम्यान, आमदारांनी मोटारी व वैद्यकीय उपचारांसाठी सवलतीचा लाभ घेतला असला तरी गेल्या दोन वर्षात एकाही आमदाराने गृह बांधणीसाठी कर्ज उचललेले नाही.आता घ्या, ४० लाखांपर्यंत मोटार!

दरम्यान, विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात कायदा दुरुस्ती विधेयक संमत करुन आमदारांची पेन्शन वाढवण्यात आलेली आहे. त्याच बरोबर मोटार खरेदीसाठी कर्जमर्यादा १५ लाखांवरून ४० लाख रुपये केली आहे. पेट्रोल किंवा डिझेल दरमहा ३०० लिटरवरून ५०० लिटर,घर खरेदीसाठी कर्ज मर्यादा ३० लाखांवरून ४५ लाख रुपये करण्यात आली आहे. सभापतींसाठी वैद्यकीय भत्ता ३ लाख रुपयांवरून ५ लाख रुपये करण्यात आला आहे.ही वाढ केल्यानंतर आजपावेतो एकाही आमदाराने मोटारीसाठी कर्जाकरिता अर्ज केलेला नाही, अशी माहितीही आरटीआय उत्तरातून प्राप्त झालेली आहे.