शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

कोकण मार्गावर तीन महिन्यांत पकडले १४,१५० फुकटे प्रवासी; ८६ लाखांचा दंड वसूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 08:01 IST

सणांदरम्यान जास्त प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : रेल्वेत फुकट्या प्रवाशांची संख्या काही कमी नसते. हे फुकटे प्रवासी रेल्वे तिकीट तपासणी करणाऱ्यांच्या हातीही लागतात. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या रेल्वेतून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई सुरू असून, या वर्षीच्या ऑगस्ट ते ऑक्टोबर या तीन महिन्यात १४,१५० जणांवर कारवाई करताना त्यांच्याकडून ८६ लाख ३७ हजार ८२० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

सणाच्या दिवशी विशेषतः गणेश चतुर्थी व दिवाळीच्यावेळी रेल्वेचे आरक्षण फुल्ल असते, या काळात अनेकजण विनातिकीट प्रवास करण्याचे डेअरिंग करतात व ते त्यांच्या अंगलटही येते. त्यामुळे असा फुकटा प्रवास न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ८६ लाख ३७ हजार रुपये तीन महिन्यात फुकट्या प्रवाशांकडून वसूल करण्यात आले. चालू वर्षाच्या ऑगस्ट ते ऑक्टोबर या तीन महिन्यांत १४ हजार १५० फुकट्या प्रवासांवर रेल्वे प्रशासनाने कारवाई केली आहे. एकूण ८६,३७, ८२० रुपये दंडही वसूल करून घेण्यात आला.

दिवाळीला रेल्वेला गर्दी

दिवाळीला नेहमीच रेल्वेला गर्दी असते. रेल्वे प्रवास हा सोयीस्कर व आरामदायी असल्याने लोक रेल्वेतून प्रवास करणे पसंत करतात. दिवाळीच्या वेळी स्पेशल रेल्वेही धावतात, मात्र रेल्वेची तिकीट मिळणे अनेकदा दुरापास्त ठरते. एवढी प्रवाशांची गर्दी असते.

आरक्षण मिळेना

दिवाळीला रेल्वेचे आरक्षण मिळणे महाकठीणच असते. सर्वच रेल्वे फुल्ल असतात, मोठ्या प्रमाणात लोक आपल्या गावी येत असतात. तसेच सुट्या असल्याने पर्यटनासाठीही जात असतात. त्यामुळे रेल्वेत लोकांची गर्दी असते, आरक्षित तिकीट मिळणे अनेकदा मुश्कील असते.

गोव्यात मुंबईला जाणाऱ्यांची तसेच मुंबईहून गोव्यात येणाऱ्यांची संख्या जास्त असते. दिवाळीला तर या मार्गावरून धावणाऱ्या सर्वच रेल्वे गाड्या फुल्ल असतात. रेल्वे प्रवासात विनातिकीट प्रवास करणे हा गुन्हा आहे. अशा प्रवाशांना पकडून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. प्रवाशांनी अधिकृत तिकीट काढूनचनंतर रेल्वेतून प्रवास करावा. - बबन घाटगे, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी कोकण रेल्वे.

 

टॅग्स :goaगोवाKonkan Railwayकोकण रेल्वे