शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

जीआय टॅगसाठी पाठवली १२ उत्पादने: बाबूश मोन्सेरात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 13:30 IST

शाळांना यापुढे वैज्ञानिक कार्यक्रमांसाठी अनुदान

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : सरकारने जीआय टॅगसाठी १२ स्थानिक उत्पादने चेन्नईला पाठवली आहेत. तर राज्यातील शाळांना यापुढे वैज्ञानिक कार्यक्रमांसाठी अनुदान दिले जाईल. तुये येथे बांधकाम कचऱ्यासाठी तात्पुरती जागा शोधली आहे, अशी माहिती महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी काल विधानसभेत दिली.

भू-नोंदणी, महसूल, जिल्हाधिकारी, कामगार, रोजगार व विज्ञान-तंत्रज्ञान खात्यांच्या अनुदान मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. मोन्सेरात म्हणाले की, भू-नक्षा जमीन मॅपिंग सिस्टममध्ये विसंगती आढळून आलेल्या आहेत. काही संरचना बदलण्यात आल्या आहेत. आम्हाला बदल लक्षात आले आणि ते पूर्ववत केले आहेत. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या प्रकरणी चौकशी (पान १ वरून) करून योग्य ती कारवाई केलीजाईल, असे आश्वासन दिले. 

व्यवसाय सुलभकरण्यासाठी सरकारने ध्वनी आणि सार्वजनिक कार्यक्रम मंजुरीसाठी सिंगल विंडो सिस्टम सुरू केली आहे. ग्रामीण नेटवर्क समस्या सोडवण्यासाठी बीएसएनएलशी भागीदारी केली आहे. कामगारांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे.

मामलेदारांची चौकशी सुरू

म्हापसा मामलेदारांनी आर्थिक दृष्ट्या कमकुवत घटकातील असल्याचे बनावट प्रमाणपत्र वापरून पद मिळवले. याप्रकरणी चौकशी सुरू आहे. सर्व कागदपत्रांची छाननी सुरू आहे. तसेच भंगार अड्डे स्थलांतरित करण्यासाठी कचरा व्यवस्थापन महामंडळ सध्या योग्य जागा शोधत आहे. साळगाव कचरा प्रकल्पात प्रक्रिया केलेल्या ५.५ लाख टन कचऱ्यातून ४.१२ कोटी युनिट वीज निर्माण झाली. कुडचडे कचरा प्रक्रिया प्रकल्पानेन ४.५ लाख टन प्रक्रिया केली आणि ५८ लाख युनिट उत्पादन केले, अशी माहिती मंत्री मोन्सेरात यांनी दिली.

तिसऱ्या जिल्ह्याबाबत अंतिम निर्णय नाहीच

बाबूश मोन्सेरात म्हणाले की, गोव्यात तिसरा जिल्हा निर्माण करण्याचा प्रस्ताव केवळ विचाराधीन आहे. याबाबतीत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. महसूल विभागाअंतर्गत बहुतेक सेवा आधीच ऑनलाइन उपलब्ध आहेत. सर्व महसूल कार्यालये नागरिक अनुकूल आणि सामान्य माणसांच्या गरजांना प्रतिसाद देत आहेत. सर्व सेवा एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर एकत्रित करण्यात येत आहेत.

 

टॅग्स :goaगोवाvidhan sabhaविधानसभा