शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
3
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
4
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
5
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
6
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
7
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
8
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
9
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
10
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
11
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
12
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
13
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
14
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
15
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
16
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
17
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
18
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
19
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
20
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...

१२ विद्यार्थिनी अत्यवस्थ; चौकशीस सुरुवात, डिचोली येथील शांतादुर्गा विद्यालयातील घटनेने खळबळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2023 11:06 IST

'ते' विद्यार्थी निलंबित होणार; 'पेपर स्प्रे'चा वापर केल्याचा संशय

लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली: डिचोली येथील शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालयातील १२ विद्यार्थ्यांना काल श्वसनाचा त्रास सुरू झाल्याने एकच खळबळ माजली. अकरावीच्या अ तुकडीत वर्ग सुरू असतानाच हा प्रकार घडल्याने शिक्षकांचीही भंबेरी उडाली. 

तातडीने पळापळ करत विद्यार्थ्यांना डिचोली व म्हापसा येथील आझिलो इस्पितळात दाखल करण्यात आले. रात्री उशिरा दहा जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले. काही विद्यार्थ्यांनी पेपर स्प्रेचा वापर केल्याने हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. चार ते पाच विद्यार्थ्यांनी हा प्रताप केल्याचे समोर आले असून त्यांची ओळख पटली आहे. या विद्यार्थ्यांवर कारवाईचे संकेत आहेत.

सविस्तर माहितीनुसार, नेहमीप्रमाणे काल शांतादुर्गा विद्यालयात वर्ग सुरू असतानाच अकरावी अ तुकडीत एकच गोंधळ उडला. वर्गातील विद्यार्थ्यांना श्वसनाचा त्रास सुरू होऊन चक्कर येऊ लागल्याने व्यवस्थापनाची पाचावर धारण बसली. तातडीने या विद्यार्थ्यांना डिचोली सरकारी इस्पितळात दखल करण्यात आले. त्यातील दहा विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी म्हापसा येथील आझिलो इस्पितळात पाठवले.

या घटनेची माहिती पालकांपर्यंत पोहोचताच त्यांनी इस्पितळांमध्ये धाव घेतली. डिचोलीचे पोलिस निरीक्षक राहुल नाईक आपल्या पथकासह विद्यालयात दाखल झाले. यावेळी पोलिसांनी वर्गात पेपर स्प्रेचा वापर केला असावा, असा संशय व्यक्त केला आहे. दरम्यान, या प्रकराला विद्यालयातील चार ते पाच विद्यार्थी जबाबदार असल्याची माहिती समोर आली असून त्यांची ओळख पटली आहे. सध्या शाळा व्यवस्थापन या विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

दहा जणांना डिस्चार्ज

वर्गात जो उग्रवास आला व त्यातून मुलांना श्वसनाचा त्रास झाला तो पेपर स्प्रे होता की अन्य काही होते या बाबत तपास करण्यात येत आहे. पोलिस पथकाने उपचार घेणाऱ्या मुलांशीही चर्चा केली आहे. रात्री १२ पैकी १० जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.

सीसीटीव्ही फुटेज ताब्यात

या संदर्भात विद्यालय व्यवस्थापनाने गंभीर दखल घेत पोलिसांना माहिती दिली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही व इतर माध्यमातून या प्रकरणाची चौकशी केली असून अधिक तपास करण्यात येत आहे. व्यवस्थापन समितीने या संदर्भात कसून चौकशी सुरु आहे.

या प्रकरणात विद्यार्थ्यांचा सहभाग असल्याने हे प्रकरण अतिशय काळजीपूर्वीक हाताळले जाईल. पोलिस तसेच शिक्षण खात्यामार्फत कसून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. काही विद्याथ्र्यांनीय स्प्रे मारल्याची माहिती माझ्यापर्यंत आली आहे. योग्य चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याचे व्यवस्थापनास आदेश दिले आहेत. -डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री.

विद्यालयात विद्याथ्यांकडूनच झालेला प्रकार अतिशय गंभीर आहे. सर्वजण अल्पवयीन असल्यामुळे व्यवस्थापनाने या प्रकरणाची योग्य चौकशी करून संबंधित विद्यार्थ्यांवर कारवाई करावी. तसेच मुलांच्या सुरक्षेसाठी वर्गात व विद्यालयाच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. राहुल नाईक, पोलिस निरीक्षक.

डिचोली येथील उच्च माध्यमिक विद्यालयातील ११ विद्यार्थ्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यातील १० विद्यार्थ्यांना डिस्चार्ज दिला आहे. एका विद्यार्थ्याला ताप होता. त्यामुळे निरीक्षणासाठी त्याला रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले आहे. सर्वांची तब्येत चांगली आहे. - डॉ. वंदना घुमे, वैद्यकीय अधिक्षक.

कारणे दाखवा नोटीस

शिक्षण खात्याने काल सायंकाळी उशिरा शांतादुर्गा विद्यालयावर कारवाई का केली जाऊ नये, अशी विचारणा करणारी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तीन दिवसांच्या आत सविस्तर अहवाल व स्पष्टीकरण मागितले आहे. शिक्षण संचालक शैलेश झगडे नोटिसीतम्हणतात की, अशा घटना विद्यार्थ्यांवरच परिणाम करतात असे नव्हे तर शिक्षण व्यवस्थेलाही बाधकआहेत. शाळा संस्थेच्या चेअरमनना ही नोटीस बजावण्यात आली.

 

टॅग्स :goaगोवाSchoolशाळा