शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातील सर्व आर्थिक दुर्बलांना 10 टक्के आरक्षण, नोकरी व शिक्षणासाठी लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2019 17:01 IST

हिंदू, मुस्लिम अशा सर्व धर्मामधील सर्वसाधारण गटातील (जनरल कॅटेगरी) ज्या कुटूंबांचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांर्पयत मर्यादित आहे, अशा आर्थिक दुर्बलांना 10 टक्के आरक्षण दिले जाणार आहे.

पणजी - हिंदू, मुस्लिम अशा सर्व धर्मामधील सर्वसाधारण गटातील (जनरल कॅटेगरी) ज्या कुटूंबांचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांर्पयत मर्यादित आहे, अशा आर्थिक दुर्बलांना 10 टक्के आरक्षण दिले जाणार आहे. सरकारी नोकरी आणि शिक्षणासाठी या आरक्षणाचा लाभ होणार आहे.गोवा मंत्रिमंडळाने याविषयीचा प्रस्ताव सोमवारी झालेल्या बैठकीत मंजुर केला. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकारची दुसरी मंत्रिमंडळ बैठक पर्वरीत झाली. केंद्र सरकारने देशभरासाठी याविषयीचा कायदा आणला आहे. तोच आम्ही आता स्वीकारला आहे व त्याचा लाभ गोव्यातील सर्व धर्माच्या मोठय़ा संख्येने लोकांना होईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले. ज्यांचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांच्या खाली आहे, अशा सर्वाना दहा टक्के आरक्षण मिळेल. अशा प्रकारचे आरक्षण यापूर्वी कुणालाच मिळाले नव्हते. आम्ही ओबीसी, एससी-एसटी यापैकी कुणाच्याच आरक्षणाच्या प्रमाणात बदल न करता गोव्यात सर्वसाधारण वर्गातील आर्थिक दुर्बलांसाठी दहा टक्के आरक्षण अंमलात आणू, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.नवे एजी देवीदास पांगम  राज्यासाठी नवे अॅडव्हकेट जनरल नियुक्त करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. देवीदास पांगम हे नवे एजी असतील, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. स्व. मनोहर र्पीकर सरकार अधिकारावर असताना प्रथम आत्माराम नाडकर्णी हे अॅडव्हकेट जनरल होते. मग दत्तप्रसाद लवंदे यांची नियुक्ती एजीपदी करण्यात आली. लवंदे यांनी अजून राजीनामा दिलेला नाही. ते राजीनामा देतील. तथापि, पांगम यांची नियुक्ती निश्चित झाली आहे.काकोडा- कुडचडे येथे शिक्षण खात्याची चार हजार चौरस मीटर जागा आहे. ही जागा संजय स्कुलच्या इमारतीसाठी हस्तांतरित करावी असाही निर्णय मंत्रिमंडलाने घेतला. येत्या 15 जुलै रोजी विधानसभेचे  अधिवेशन बोलवावे, असाही निर्णय झाला. अधिवेशन दि. 9 ऑगस्टर्पयत चालेल.

टॅग्स :goaगोवाGovernmentसरकार