सातारा : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सलगतेने जास्त पाऊस झालेला आहे व सद्य:स्थितीतही पाणलोट क्षेत्रात पर्जन्यवृष्टी सुरू असून, कोयना धरणात एकूण ७९ टीएमसी एवढा पाणीसाठा झालेला आहे.
पाणीपातळी राखण्यासाठी शनिवार, दि. २९ रोजी पासून धरण पायथा, विद्युतगृहातून सुमारे २००० क्युसेक क्षमतेने पाण्याचा विसर्ग होणार आहे. त्यानंतर सांडव्यावरूनही १ आॅगष्टपासून पाणी सोडावे लागणार आहे, अशी असल्याचे माहिती कार्यकारी अभियंता कोयना सिंचन विभाग कोयनानगरचे ज्ञा. आ. बागडे यांनी दिली.धरणाच्या खालील भागातील नदीकाठची गावे, वाड्या-वस्त्यांमध्ये राहणाºया नागरिकांनी, सुरक्षेच्या कारणास्तव नदीपात्रात प्रवेश करू नये, तसेच वीजमोटारी, इंजिने, शेती अवजारे अथवा तत्सम साहित्य व पशुधन यांच्याही सुरक्षेची काळजी घ्यावी, असेही आवाहन कण्यात आले आहे