शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

जळालेली डीपी व वाकलेल्या विद्युत खांबांची अजुनही दुरुस्ती नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 05:00 IST

नियमित विद्युत पुरवठा सुरू असताना गेल्या पंधरा दिवसांपूर्वी वादळ वाऱ्यामुळे तेथील  प्रभाकर गव्हारे यांच्या घराजवळ असलेली डीपी पूर्णतः जळाली. काही दिवसांतच वसंत सुरजागडे यांच्या घराजवळील विद्युत खांब वाकला. त्यामुळे विद्युत तारा जमिनीवर कोसळल्या. ही घटना घडली असता त्यावेळी गावातील नागरिक कुणीच खांबाजवळ नव्हते. नाही तर जिवंत विद्युत तारांचा स्पर्श होऊन अनुचित प्रकार घडला असता.

लाेकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी :  तालुक्याच्या ग्रामपंचायत     कुनघाडा रै. अंतर्गत येणाऱ्या उमरेड टोला येथे गेल्या पंधरा दिवसांपासून विद्युत डीपी जळून, विद्युत खांब वाकल्याने विद्युत तारा जमिनीवर कोसळल्या आहेत.. विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे दुसऱ्या डीपीवरून विद्युत पुरवठा सुरू करण्यात आला असला तरी, वेळोवेळी पुरवठा खंडित होत असल्यामुळे विजेचा लपंडाव अद्यापही कायमच आहे. मात्र, याकडे महावितरण कंपनीचे दुर्लक्ष होत आहे. कुनघाडा रै. ग्रामपंचायतअंतर्गत वॉर्ड ४ मधील  उमरेड टोला हे छोटेसे  गाव बांध तलावाच्या काठावर वसले आहे. गावाची लोकसंख्या जवळपास दीडशे ते दोनशे आहे. गावात विजेची समस्या लक्षात घेऊन, गेल्या अनेक दिवसांपासून विद्युत लाईन टाकण्यात आली आहे. गावात विद्युत पुरवठा होण्यासाठी  विद्युत डीपी लावून मुख्य ठिकाणी  विद्युत खांब गाडण्यात  आले आहेत. नियमित विद्युत पुरवठा सुरू असताना गेल्या पंधरा दिवसांपूर्वी वादळ वाऱ्यामुळे तेथील  प्रभाकर गव्हारे यांच्या घराजवळ असलेली डीपी पूर्णतः जळाली. काही दिवसांतच वसंत सुरजागडे यांच्या घराजवळील विद्युत खांब वाकला. त्यामुळे विद्युत तारा जमिनीवर कोसळल्या. ही घटना घडली असता त्यावेळी गावातील नागरिक कुणीच खांबाजवळ नव्हते. नाही तर जिवंत विद्युत तारांचा स्पर्श होऊन अनुचित प्रकार घडला असता. या घटनेस पंधरा दिवस उलटले.   डीपी जोडून विद्युत खांब पूर्ववत कण्यासंदर्भात नागरिकांनी वेळोवेळी महावितरण कंपनीच्या तळोधी उपकेंद्राला कळविले आहे. मात्र, महावितरणने याकडे दुर्लक्ष केले आहे. संबंधित वरिष्ठ अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी दखल घेऊन विद्युत डीपी व विद्युत खांब  पूर्ववत करून नियमित विद्युत पुरवठा सुरू करावा,  अशी मागणी उमरेडवासीयांनी केली आहे. पाठपुरावा करूनही महावितरणच्या कर्मचारी दुर्गम भागात वीज सुरळीत करण्यासाठी लवकर पाेहाेचत नाही. परिणामी वादळाने वीज पुरवठा खंडित झाल्यास दाेन ते तीन दिवस प्रतीक्षा करावी लगते. त्यानंतर वीज पुरवठा सुरळीत हाेत असते.

महावितरण कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे प्रकार घडल्याचा आराेपउमरेट टोला हे गाव कुनघाडा रै. ग्रामपंचायतअंतर्गत वाॅर्ड ४ मधील एक भाग आहे, गावात विजेची समस्या लक्षात घेऊन विजेची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी तेथील डीपी जळून, विद्युत खांब वाकले, तसेच विद्युत तारा खाली कोसळल्या. त्यामुळे गावातील विद्युत पुरवठा खंडित झाला. हा प्रकार महावितरणचे अधिकारी व कर्मचारी यांच्या निष्काळजीपणामुळे घडला असून, दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अनिल कोठारे यांनी केली आहे. सध्या दुसऱ्या डीपीवरून गावात विद्युत पुरवठा सुरू आहे. मात्र, हा विद्युत पुरवठा सायंकाळच्या वेळी वेळोवेळी खंडित होत आहे. तत्काळ डीपी लावून विद्युत पुरवठा सुरू करावा तसेच वाकलेले खांब सरळ करून वीज तारा जोडण्यात याव्यात, अशी मागणी अनिल कोठारे यांनी केली आहे.

 

टॅग्स :electricityवीज