शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Gadchiroli | मित्राला वाचविण्याच्या प्रयत्नात युवकाचा बुडून मृत्यू; कुरखेड्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2022 15:56 IST

एकाला वाचविण्यात दुसऱ्याचा गेला जीव

कुरखेडा (गडचिरोली) : गावातील महिलेचे अंत्यसंस्कार आटाेपून सती नदीत बांधलेल्या बंधाऱ्यावरून परत येत असताना मित्राचा पाय घसरून ताे बुडू लागला. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात पाण्यात उतरलेल्या दुसऱ्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना १६ सप्टेंबर राेजी दुपारी १ वाजता घडली.

चेतन मधुकर सलामे (वय २२, रा. मोहगाव, वाकडी) असे मृृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. कुरखेडा शहरातील एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याने त्या महिलेच्या अंत्यसंस्कारासाठी चेतन आपल्या मित्रांसह सती नदी घाटावर गेला होता. अंत्यसंस्कार पार पाडल्यानंतर पाच-सहा मित्र नदी पुलावरून परत न येता पात्रात असलेल्या बंधाऱ्यावरून येण्याचा प्रयत्न करीत हाेते. सदर बंधाऱ्यावरून पाणी वाहत हाेते. दरम्यान, पाय घसरून बंधाऱ्याजवळील खोल खड्ड्यातील पाण्यात एक युवक बुडू लागला. त्याला वाचविण्यासाठी चेतन सलामे पाण्यात उतरला.

त्या युवकाला वाचविण्याच्या प्रयत्नात चेतन सुद्धा बुडू लागला. यावेळी इतर युवकांनी हातांची साखळी तयार करून पहिल्या युवकाला पाण्यातून बाहेर काढले. त्याचा जीव वाचला; मात्र चेतनला वाचविण्यासाठी थाेडा उशीर झाल्याने ताे पाण्यात बुडाला. पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. सदर घटनेबाबत कुरखेडा पोलीस स्टेशनमध्ये मर्ग दाखल करण्यात आला.

टॅग्स :drowningपाण्यात बुडणेDeathमृत्यूGadchiroliगडचिरोली