शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
3
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
4
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
5
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
6
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
7
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
8
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
9
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
10
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
11
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
12
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
13
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
14
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
15
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
16
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
17
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
18
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
19
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
20
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...

युवक काँग्रेसचे निषेधासन आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 00:57 IST

भाजपप्रणीत राज्य सरकारला ३१ आॅक्टोबर २०१८ रोजी चार वर्ष पूर्ण झाली. मात्र भाजप सरकार व पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता अद्यापही झाली नाही. सरकारच्या जनहितवादी धोरणाविरोधात स्थानिक इंदिरा गांधी चौकात युवक काँग्रेसच्या वतीने निषेधासन आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देविविध योगासने : सरकारच्या धोरणाविरोधात कार्यकर्त्यांनी व्यक्त केला संताप

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : भाजपप्रणीत राज्य सरकारला ३१ आॅक्टोबर २०१८ रोजी चार वर्ष पूर्ण झाली. मात्र भाजप सरकार व पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता अद्यापही झाली नाही. सरकारच्या जनहितवादी धोरणाविरोधात स्थानिक इंदिरा गांधी चौकात युवक काँग्रेसच्या वतीने निषेधासन आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सरकारच्या दुटप्पी धोरणाबाबत संताप व्यक्त केला.या आंदोलनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ.डॉ.नामदेव उसेंडी, प्रदेश सचिव हसनअली गिलानी, युकाँचे लोकसभा क्षेत्र अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, शहर अध्यक्ष तथा नगरसेवक सतीश विधाते, प्रशांत आखाडे, शंकरराव सालोटकर, सी.बी.आवळे, पी.टी.मसराम, पांडुरंग घोटेकर, प्रभाकर वासेकर, काशिनाथ भडके, मिलींद बागेसर, मिलींद खोब्रागडे, अमोल भडांगे, उमेश कुळमेथे, आशिष कन्नमवार, विश्वजित कोवासे, बाळू मडावी, रजनिकांत मोटघरे, प्रकाश मोहुर्ले, निखील खोब्रागडे, प्रतीक बारसिंगे, विवेक घोंगडे, अभिजीत धाईत, तौफिक शेख, राकेश गणवीर, एजाज शेख, महेश जिल्लेवार, राकेश गिरसावळे, कमलेश खोब्रागडे, एनएसयूआयचे अधीर इंगोले, वैभव कडस्कर तसेच सूरज मडावी, योगेश नैताम, फारूख अली, नीलेश मेश्राम, विजय वागुलकर, पंकज बारसिंगे, प्रकाश खेडेकर आदी उपस्थित होते.सर्व आघाड्यांवर सरकार अपयशी; जनतेचा भ्रमनिरास- नामदेव उसेंडीभाजपच्या पदाधिकाºयांनी २०१४ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान गडचिरोली जिल्ह्यासह महाराष्ट्रातील जनतेला मोठमोठी आश्वासने दिली. मात्र चार वर्षांचा कालावधी उलटूनही या सरकारला एकही आश्वासन पूर्ण करता आले नाही. भाजपप्रणीत सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहेत, असा घणाघाती आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ.डॉ.नामदेव उसेंडी यांनी यावेळी भाषणातून केला. विद्यमान सरकारची कर्जमाफी योजना पूर्णत: फसली असून सरकारच्या या धोरणाने शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार युवक व विद्यार्थ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. या सरकारच्या काळात शेतकरी देशोधडीला लागला आहे, असेही डॉ.नामदेव उसेंडी यावेळी म्हणाले.

टॅग्स :congressकाँग्रेस