औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील ८० व्यवसाय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी इयत्ता १० वी उत्तीर्ण व ११ व्यवसाय अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक अर्हता आहे. प्रवेश निश्चितीसाठी आवश्यक कागदपत्रे प्राप्त करून घेण्यासाठी पुरेसा कालावधी मिळावा यासाठी प्रवेश प्रक्रियेदरम्यान आवश्यक कागदपत्रांची यादीदेखील प्रवेश संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. औद्याेगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश अर्ज भरताना उमेदवारांनी त्यांचा इयत्ता १० वी परीक्षेचा बैठक क्रमांक नमूद केल्यास त्यांची वैयक्तिक व इयत्ता १० वीच्या परीक्षेतील गुण याबाबत सर्व माहिती प्रवेश अर्जात आपोआप नमूद होईल. तसेच प्रवेश अर्ज शुल्क भरण्यासाठी प्रवेश संकेतस्थळावर ऑनलाइन शुल्क भरण्याचे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे कौशल्य प्रशिक्षणाचा लाभ जास्तीत जास्त युवकांनी घ्यावा,असे संस्थेचे प्राचार्य संतोष सांळुके यांनी कळविले आहे.
काैशल्य प्रशिक्षणाचा लाभ युवकांनी घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:23 IST