शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शेत मशागतीचे काम करताना राेटावेटरमध्ये सापडून युवकाचा मृत्यू; शिर झाले धडावेगळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2022 12:21 IST

वडधा येथील घटना

वडधा (गडचिरोली) : पीक लागवडीसाठी ट्रॅक्टरद्वारे शेतीची मशागत करताना राेटावेटरमध्ये सापडून युवकाचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची ही घटना आरमाेरी तालुक्यातील वडधानजीकच्या एका शेतात रविवारी (दि. ४) सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत युवकाचे शिर धडावेगळे झाले.

अंकुश रामभाऊ दाेडके (२९, रा. देलाेडा खुर्द) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. अंकुश दाेडके हा वडधा येथील राजेंद्र ठाकूर यांच्या ट्रॅक्टरवर चालक म्हणून काम करीत हाेता. नेहमीप्रमाणे ताे रविवारी ट्रॅक्टर चालविण्यासाठी गेला हाेता. रविवारी वडधा-खरपी मार्गावरील नाल्यालगत असलेल्या परसराम सयाम यांच्या शेतात ट्रॅक्टरला राेटावेटर जाेडून मशागतीचे काम सुरू हाेते. दरम्यान, सायंकाळी ५:३० वाजताच्या सुमारास अपघात घडला. अपघातात अंकुशचा चेंदामेंदा हाेऊन शिर धडावेगळे झाले. एक पायसुद्धा तुटला. विशेष म्हणजे, एका बांधित मृतकाचे प्रेत हाेते, तर दुसऱ्या बांधित ट्रॅक्टर उभे हाेते. त्यामुळे अपघात नेमका कसा घडला याबाबत अनेक शंका आहेत.

ट्रॅक्टर चालविणारा काेण?

परसराम सयाम यांच्या शेतात पीक लागवडीसाठी मशागत करताना अंकुश हा ट्रॅक्टर चालवित हाेता, की अन्य काेण वाहन चालवित हाेते? अंकुश जर ट्रॅक्टर चालवित हाेता तर ताे मागील बाजूला कसा पडला? दुसरा व्यक्ती वाहन चालवित तर नसावा ना? व अंकुश हा ट्रॅक्टरच्या मधील टायरच्या मडगार्ड कव्हरवर बसला तर नसावा ना, असे अनेक प्रश्न उपस्थित हाेत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूGadchiroliगडचिरोली