शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

यावर्षी शाळकरी मुलींना सायकलींचे वाटपच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 01:27 IST

मानव विकास मिशनअंतर्गत जि.प.च्या माध्यमिक शिक्षण विभागामार्फत दरवर्षी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील गावापासून शाळेपर्यंत अपडाऊन करणाऱ्या विद्यार्थिनींना सायकलींचे मोफत वाटप केले जाते. या योजनेंतर्गत शिक्षण विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिनस्थ नियोजन विभागाकडे प्रस्ताव सादर केला.

ठळक मुद्देनिधीचा तुटवडा : सत्र संपत असताना विद्यार्थ्यांची प्रतीक्षा कायम

दिलीप दहेलकर ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मानव विकास मिशनअंतर्गत जि.प.च्या माध्यमिक शिक्षण विभागामार्फत दरवर्षी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील गावापासून शाळेपर्यंत अपडाऊन करणाऱ्या विद्यार्थिनींना सायकलींचे मोफत वाटप केले जाते. या योजनेंतर्गत शिक्षण विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिनस्थ नियोजन विभागाकडे प्रस्ताव सादर केला. मात्र तीन महिने उलटूनही सदर प्रस्तावावर कार्यवाही झाली नाही. या योजनेसाठी निधीच मंजूर न केल्याने शालेय सत्र अंतिम टप्प्यात असताना दोन हजारांवर विद्यार्थिनी सायकलच्या प्रतिक्षेत आहेत.जि.प. माध्यमिक शिक्षण विभागाच्या अखत्यारित जिल्ह्याच्या बाराही तालुक्यातील शेकडो माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आहेत. विद्यार्थी रहिवासी असलेल्या गावात शाळा नसल्याने गावातील अनेक विद्यार्थी पाच ते सहा किलोमीटर अंतरावरील दुसºया गावातील शाळांमध्ये शिक्षणासाठी जातात. ज्या विद्यार्थ्यांना मानव विकास मिशनची बस सुविधा मिळू शकत नाही, अशा विद्यार्थिनींना मोफत सायकल उपलब्ध करून दिली जाते. गेल्या तीन ते चार वर्षात सातत्याने अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांना सायकलीचा लाभ देण्यात आला. मात्र यंदा शालेय सत्राचे सहामाही सत्र संपूनही सायकल वाटपाची कार्यवाही हाती घेण्यात आली नाही.मानव विकास मिशनचा निधी प्राप्त झाल्यानंतर हा निधी शिक्षण विभागातर्फे संबंधित शाळांच्या खात्यात वळविला जातो. यासाठी शिक्षण विभागाने सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत संबंधित शाळांमधील विद्यार्थ्यांकडून प्रस्ताव मागविले होते. त्यानंतर प्राप्त प्रस्तावाबाबत नियोजन आराखडा ठरवून परिपूर्ण प्रस्ताव नियोजन विभागाकडे सादर करण्यात आला. परंतू निधीअभावी त्या प्रस्तावाला मंजुरीच मिळाली नसल्याची माहिती आहे.विद्यार्थिनींना सायकल वाटप योजनेबाबतचा प्रस्ताव मानव विकास मिशनच्या कार्यालयाकडे सादर करण्यात आला आहे. मात्र अद्यापही आर्थिक तरतूद करून या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली नाही. यासंदर्भात महिनाभरापूर्वी नियोजन विभागाकडे विचारणाही केली होती.- रमेश उचे, शिक्षणाधिकारी (माध्य.) जि.प.गडचिरोलीएक कोटी रुपयांचा खर्चशिक्षणासाठी दररोज दुसऱ्या गावी जाणाऱ्या जवळपास तीन हजार विद्यार्थिनींना सायकली वाटपाचे नियोजन शिक्षण विभागाने केले आहे. यासाठी जवळपास एक कोटी रुपये लागणार आहेत. पूर्वीच्या तुलनेत आता एका सायकलमागे ५०० रुपयांची वाढ झाली आहे. पूर्वी तीन हजार रुपयांचे अनुदान एका विद्यार्थ्याला मिळत होते. आता प्रतीविद्यार्थी ३ हजार ५०० रुपये मिळणार आहेत. मात्र यासाठीचा प्रस्ताव मानव विकास मिशनच्या नियोजन विभागाने अद्यापही मंजूर केला नसल्याने विद्यार्थिनींची शाळेपर्यंतच्या प्रवासाची पायपीट सुरूच आहे. हे सत्र संपण्यासाठी अवघे २ महिने शिल्लक आहेत. त्यामुळे यंदाच्या सत्रात विद्यार्थिनींना सायकली मिळणार की नाही, अशी शंका उपस्थित केली जात आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थी