शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

यवतमाळच्या कारागिरांनी घेतला जि.प. शाळेत आश्रय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 5:00 AM

यवतमाळ जिल्ह्याच्या पिंपळशेंडा व पांढरकवडा येथील चार कुटुंब मागील सहा महिन्यांपासून रोजगारासाठी देलनवाडी परिसरात आले आहेत. गॅस, शेगडी व कुकर दुरूस्तीचे काम करून हे कारागिर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असतात. याच कामासाठी ते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आरमोरी तालुक्यात आले. मात्र कोरोनारूपी संकटामुळे त्यांचा व्यवसाय थांबला आहे.

ठळक मुद्देप्रशासनाकडून सुविधा : देलनवाडीत सहा महिन्यांपासून मुक्काम

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : यवतमाळ जिल्ह्यातून रोजगारासाठी आरमोरी तालुक्यात आलेले चार कुटुंबातील १७ लोक कोरोनाच्या संचारबंदीने अडकून पडले. तालुका प्रशासनाने दखल घेऊन सदर कुटुंबांना निवासासाठी देलनवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या खोल्या उपलब्ध करून दिल्या. या कारागिरांना जीवनाश्यक वस्तू व धान्य उपलब्ध करून देण्यात आले.यवतमाळ जिल्ह्याच्या पिंपळशेंडा व पांढरकवडा येथील चार कुटुंब मागील सहा महिन्यांपासून रोजगारासाठी देलनवाडी परिसरात आले आहेत. गॅस, शेगडी व कुकर दुरूस्तीचे काम करून हे कारागिर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असतात. याच कामासाठी ते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आरमोरी तालुक्यात आले. मात्र कोरोनारूपी संकटामुळे त्यांचा व्यवसाय थांबला आहे.संचारबंदीमुळे हे कारागिर फिरू शकत नसल्याने त्यांच्यापुढे आर्थिक समस्या निर्माण झाली आहे. ही बाब माहित होताच तहसीलदार कल्याणकुमार डहाट, गटशिक्षणाधिकारी बी. जी. नरोटे, तलाठी तिम्मा, देलनवाडीचे सरपंच माणिक पेंदाम, जि. प. शाळेचे मुख्याध्यापक रतन बन्सोड, शिक्षक संतोष मने यांनी कारागिर असलेल्या ठिकाणी भेट देऊन वस्तूस्थिती जाणून घेतली.देलनवाडी जि. प. शाळेतील खोल्या निवासासाठी उपलब्ध करून दिल्या. त्यांच्यासाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी शालेय पोषण आहारातील तांदूळ व धान्यादी माल या कारागिरांच्या कुटुंबीयांना उपलब्ध करून दिला. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष पल्लवी कुमरे, ग्रा. पं. सदस्य अनिल ठवरे, वैशाली किरमिरे, वाल्मिक नन्नावरे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Socialसामाजिक