शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

शेतकºयांच्या जखमेवर मीठ चोळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 00:21 IST

महाराष्टÑ शासनाने दिवाळीपूर्वी कर्जमाफीच्७७ाी रक्कम शेतकºयांच्या खात्यात जमा करण्याची घोषणा केली.

ठळक मुद्देवडेट्टीवारांची घणाघाती टीका : चामोर्शीत शेतकºयांचा मोर्चा, कर्जमाफी फसवी असल्याची टीका

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : महाराष्टÑ शासनाने दिवाळीपूर्वी कर्जमाफीच्७७ाी रक्कम शेतकºयांच्या खात्यात जमा करण्याची घोषणा केली. पण कोणाच्याही खात्यात रक्कम जमा न झाल्याने शेतकºयांची दिवाळी अंधारात गेली. कर्जमाफीची फसवी घोषणा करून शासनाने शेतकºयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले. क्षमता नसेल तर नाही म्हणून सांगायचे असते. आता हिच जनता सरकार उलथवून टाकल्याशिवाय राहणार नाही, असा सज्जड इशारा महाराष्टÑ प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा विधानसभेचे उपगटनेता आ.विजय वडेट्टीवार यांनी चामोर्शी येथील विराट मोर्चासमोर बोलताना दिला.गडचिरोली जिल्हा व चामोर्शी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने बुधवारी दुपारी १२ वाजता चामोर्शी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर विविध मागण्यांसाठी धडक मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्त्व आमदार विजय वडेट्टीवार, माजी खासदार मारोतराव कोवासे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आ.डॉ. नामदेव उसेंडी, अ‍ॅड.राम मेश्राम यांनी केले.या मोर्चामध्ये लोकसभा जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, जि.प. सदस्य कविता भगत, रूपाली पंदीलवार, संजय चरडुके, जिल्हा उपाध्यक्ष राजेश ठाकूर, तालुकाध्यक्ष निशांत नैताम, नगर पंचायत उपाध्यक्ष राहूल नैैताम आदी प्रामुख्याने उपस्थित होते.मोर्चाच्या यशस्वीतेसाठी माजी पं.स. सदस्य प्रमोद भगत, न.पं.सभापती विजय शातलवार, सुमेध तुरे, माणिकराव तुरे, नगरसेवक वैभव भिवापुरे, अविनाश चौधरी, मंदा सरपे, प्रज्ञा उराडे, पं. स. सदस्य धर्मशीला सहारे, चामोर्शी महिला आघाडी प्रमुख दिप्ती ताफाली, विनोद खोबे, सुरेश भांडेकर, नीलकंठ निखाडे, गडचिरोलीचे नगरसेवक सतीश विधाते, जिल्हा कोषाध्यक्ष प्रज्ञा वासेकर, नाना पसपुलवार, टी.टी. मसराम, मोटघरे, अ‍ॅड.रामदास कुनघाडकर, संजय पंदिलवार, शंकर मारशेट्टीवार, ग्रा.पं. सदस्य माया ठाकूर, श्रावण दुधबावरे, माजी पं. स. सभापती रामभाऊ मानापुरे, पीतांबर वासेकर, मारेश्वर ऐडलावार, माणिकराव तुरे, अशोक तिवारी, संजय वडेट्टीवार, नानू उपाध्ये, गंगाधर पोटवार, शंकर सालोटकर, अविनाश चलाख, लोकेश शातलवार, संतोष भांडेकर, नंदू वाईलकर यांच्यासह बहुसंख्य शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार, युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आदींनी सहकार्य केले.या मोर्चानंतर विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यात प्रामुख्याने पेट्रोल व डिझेलची दरवाढ कमी करण्यात यावी, गरीब, शेतकरी, शेतमजुरांना स्वस्त धान्य दुकानदारांना साखर, केरोसीन व डाळ आदी साहित्याचा पुरवठा करण्यात यावा, संजय गांधी, श्रावण बाळ योजनेचे मानधन एक हजार रूपये करण्यात यावे, चामोर्शी उपजिल्हा रूग्णालयाचे काम त्वरित सुरू करावे, महागाईला आळा घालण्यात यावा, धानाला प्रतिक्विंटल ४ हजार ५०० रूपये भाव देण्यात यावा अशा अनेक मागण्यांचा समावेश होता.बैलबंड्यांसह धानाच्या पेंड्याही मोर्चातकाँग्रेसच्या या मोर्चात बैलबंड्यांसह शेतकºयांची उपस्थिती लक्षणिय होती. धान पिकाला लागलेल्या किडीसह धानाच्या पेंड्या, ढोलताशे व सरकारच्या निषेधार्थ विविध घोषणा दिल्या जात होत्या. हा मोर्चा एसडिओ कार्यालयावर धडकला. तिथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.या सभेत प्रमोद भगत, गंगाधर पोटवार या शेतकºयांनी आपल्या व्यथा मांडल्या. मारोतराव कोवासे, अ‍ॅड.राम मेश्राम, महेंद्र ब्राम्हणवाडे, डॉ. नामदेव उसेंडी यांनी आपल्या भाषणातून चांगलीच फटकेबाजी केली. सभेचे संचालन राजेश ठाकूर, प्रास्ताविक निशांत नैताम यांनी तर आभार सुरेश भांडेकर यांनी मानले.शेतकºयांना वेठीस धरणारा हा कोणता न्याय?सरकार गरीबांना केवळ मारण्याचे काम करीत आहे. कर्जमाफी देतो म्हणताना प्रत्यक्षात कुणालाही दिली नाही. धानाची रक्कम चेकने देणार, त्यावर जीएसटी लावणार आणि वरून तो चेक आधी कर्ज खात्यात जमा करणार हा कोणता न्याय आहे? असा सवाल यावेळी माजी खा.मारोतराव कोवासे यांनी आपल्या भाषणात केला.माजी आ.डॉ.नामदेव उसेंडी म्हणाले, जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलच्या किमती ६० टक्केपर्यंत उतरल्या असताना पेट्रोल-डिझेलचे भाव कमी होत नाही. निराधार योजनेचा लाभ सरकारने बंद केला. ओबीसी, एससी, एसटीच्या शिष्यवृत्ती ३ वर्षांपासून विद्यार्थ्यांना मिळाल्या नाही.