लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : वन्यजीवांप्रती जनजागृती करण्यासोबतच जिल्ह्याच्या वनक्षेत्रात कोणकोणते प्राणी आहेत याचे जवळून अवलोकन करण्यासाठी बौद्ध पौर्णिमेच्या रात्री जंगलातील पाणवठ्यांवर मचाण निरीक्षण करण्यात आले. यात बिबट, अस्वलांसह अनेक प्राण्यांचे दर्शन झाले.जिल्ह्यात वनांचे प्रमाण बघता प्राण्यांची संख्या अत्यंत कमी आहे. अशाही परिस्थितीत दुर्मिळ असलेले बिबट, अस्वल यासारखे प्राणी निसर्गानुभव घेणाºयांसाठी पर्वणीच ठरले होते. काही मचाण निरीक्षणस्थळी पाणवठ्यांवर हरीण, निलगाय, रानडुक्कर, रानकुत्रे, रानमांजर, ससा, पक्ष्यांमध्ये घुबड, रातवा अशाप्रकारचे प्राणी व पक्षी आढळून आले. पाणवठ्यांवरील प्रगणना बंद करून भारतीय वन्यजीव संस्थान नव्याने विकसीत केलेल्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वन्यजीवांची गणना करीत आहे. यामुळे पाणवठ्यावरील मचाण गणना बंद झाल्यानंतरही वन विभागाच्या वतीने प्रगणना घेण्यात येत आहे. याचा मुख्य उद्देश म्हणजे नागरिकांमध्ये वन, वन्यजीवांबद्दल आपुली निर्माण करणे हा आहे. गडचिरोली वनविभागाच्या वतीने गडचिरोली वनविभागाने कुनघाडा, गडचिरोली, चातगाव व उत्तर धानोरा वनपरीक्षेत्रात मचाण प्रगणना आयोजित केली होती. यामध्ये ग्रामस्थ, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, पत्रकार आदींना सामावून घेण्यात आले होते. या उपक्रमासाठी उपवनसंरक्षक एस.बी. फुले, सहाय्यक उपवनसंरक्षक सोनल भडके, शिबिर लिपिक बोरावार यांच्या मार्गदर्शनात वनपाल एम.पी. चौधरी, व्ही.एस. सालकर, वनरक्षक बी.पी. राठोड, एस.एम. पेंदोरकर, सी.पी. बोढे, ए.के. पेद्दीवार, तलमले, वनपाल, वनरक्षक, वनमजूर, गिधाडमित्र अजय कुकडकर, राकेश नैताम, पंकज फरकाडे, मकसूद सय्यद आदींनी सहकार्य केले.
जंगलात आढळले बिबट, अस्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 23:45 IST
वन्यजीवांप्रती जनजागृती करण्यासोबतच जिल्ह्याच्या वनक्षेत्रात कोणकोणते प्राणी आहेत याचे जवळून अवलोकन करण्यासाठी बौद्ध पौर्णिमेच्या रात्री जंगलातील पाणवठ्यांवर मचाण निरीक्षण करण्यात आले. यात बिबट, अस्वलांसह अनेक प्राण्यांचे दर्शन झाले.
जंगलात आढळले बिबट, अस्वल
ठळक मुद्देमचाण निरीक्षण : स्वयंसेवी संस्थांसह कर्मचाऱ्यांचा सहभाग