गडचिरोली : जिल्ह्यात शाळा, महाविद्यालयांमध्ये शनिवारी जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात आला. यावेळी लोकसंख्या वाढीची कारणे व दुष्परिणाम याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कर्मवीर दादासाहेब देवतळे महाविद्यालय, चामोर्शी : राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डी. जी. म्हशाखेत्री होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. राजेंद्र झाडे, प्रा. संजय म्हस्के, प्रा. डॉ. भूषण आंबेकर उपस्थित होते. लोकसंख्या वाढीचे जगावर होणारे दुष्परिणाम याबाबत म्हशाखेत्री यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार स्वयंसेविका अश्विनी भीसे यांनी मानले. आदर्श कला व वाणिज्य महाविद्यालय, देसाईगंज : निरंतर प्रौढ शिक्षण विभाग, सांस्कृतिक विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पी. एच. बाळबुद्धे होते. प्रमुख अतिथी म्हणून जे. पी. देशमुख, डॉ. एस. जी. गहाणे, प्रा. रमेश धोटे, प्रा. डॉ. व्ही. जी. चव्हाण उपस्थित होते. ‘आर्थिक विकासात लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम’ या विषयावर घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धे दहा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. चंद्रशेखर क्षीरसागर याने प्रथम तर महेश मोतिराम दिवठे यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला. स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा. डॉ. डी. एन. कामडी, प्रा. डॉ. एच. बी. धोटे, व प्रा. निहार बोदेले यांनी काम पाहिले. वाढत्या लोकसंख्येमुळे गरिबी, बेकारी, दरिद्री, उपासमारी, कुपोषण आदी समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे लोकसंख्येवर आळा घालण्याची गरज असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ. बाळबुद्धे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्षीरसागर तर आभार प्रा. रमेश धोटे यांनी मानले. भगवंतराव कला व विज्ञान महाविद्यालय : राष्ट्रीय सेवा योजना व निरंतर शिक्षण विभाग, विस्तार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस. एन. बुटे होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डॉ. सुधीर भगत, प्रा. निकुडे, प्रा. डॉ. कोंगरे, प्रा. एस. डी. मैंद, प्रा. पतीवार, प्रा. डॉ. पाटील, प्रा. डांगे, प्रा. बुरबुरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन रासेयो कार्यक्रम अधिकारी विश्वनाथ दरेकार यांनी तर आभार प्रा. नीलेश दुर्गे यांनी मानले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
जागतिक लोकसंख्या दिन कार्यक्रम
By admin | Updated: July 12, 2015 02:07 IST