शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
2
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
4
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
5
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
6
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
7
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
8
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
9
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
10
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
11
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
12
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
13
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
14
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
15
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
16
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
17
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
18
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
19
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
20
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख

आंध्र-तेलंगणातून मजुरांचे लोंढे दाखल होणे सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 05:01 IST

मजुरांना आणण्यासाठी विशेष बसेसची व्यवस्था करण्यात आली. या सर्व बसेसचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. मजुरांची त्या ठिकाणी आरोग्य तपासणी करण्यात आली. आपल्या गावी पोहोचल्यावर त्यांना होम क्वारंटाईन केले जाणार आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे ही प्रक्रि या पार पाडण्यात येत असल्याची माहिती पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

ठळक मुद्देप्रशासनासोबत पदाधिकारी सरसावले । धावाधाव न करता सहकार्य करा-जिल्हाधिकारी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : तेलंगणा आणि आंध्रप्रदेश राज्यात अडकलेल्या हजारो शेतमजुरांचे लोंढे गडचिरोली जिल्ह्यासह लगतच्या इतर जिल्ह्यात जाण्यासाठी महाराष्ट्राच्या हद्दीत येण्यास सुरूवात झाली. तेलंगणा सरकारने त्यांचा महाराष्ट्रात परतण्याचा मार्ग मोकळा केल्याने राज्याच्या सीमेवर दाखल झालेल्या या मजुरांना जिल्ह्यात घेताना प्रशासनाची थोडी तारांबळ उडाली. दरम्यान पालकमंत्री, आमदारांसह अनेक पदाधिकारी मदतीला धावून आल्याने मजुरांना दिलासा मिळाला.मजुरांना आणण्यासाठी विशेष बसेसची व्यवस्था करण्यात आली. या सर्व बसेसचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. मजुरांची त्या ठिकाणी आरोग्य तपासणी करण्यात आली. आपल्या गावी पोहोचल्यावर त्यांना होम क्वारंटाईन केले जाणार आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे ही प्रक्रि या पार पाडण्यात येत असल्याची माहिती पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.दरम्यान प्रशासनाकडून संचारबंदीमध्ये अडकलेल्या कामगार, प्रवासी, विद्यार्थी तसेच इतर नागरिकांची माहिती गोळा करण्याचे काम सुरूच आहे. जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या व जिल्ह्यात येणाºया इच्छुकांनी आपली नावे प्रशासनाकडे नोंदवावित, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले. सदर नावांची यादी शासनाकडे पाठविण्यात येत आहे. राज्य शासनाकडून याबाबत तातडीने प्रक्रि या होणार आहे. त्यामुळे संबंधित नागरीकांनी काळजी न करता आणि धावाधाव न करता, आहे त्या ठिकाणी थांबून सहकार्य करावे. प्रवासाच्या परवानगीबाबत दिलेल्या संपर्क क्र मांकावर कळविणार आहोत, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना उद्देशून केले.पालकमंत्र्यांनी केली विशेष बसेसची व्यवस्थाराज्य शासनाने आंध्र व तेलंगाना राज्याशी चर्चा करत मजुरांना परत आणण्यासाठी मार्ग काढला. त्यासाठी विशेष कार्य अधिकारी प्रवीण देशमुख यांच्या नेतृत्वाखाली एका टास्क फोर्सचे गठन करण्यात आले आहे. याकरिता अधिक माहितीसाठी ८००७२०३२३२, ९३५६८९४२२७, ९३५६८९५३५४ या मोबाइल क्रमांकावर संपर्क सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मजुरांना त्यांच्या स्वगावी आणता यावे यासाठी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्वखर्चातून बसेसची व्यवस्था केली असून १ मे पासून या प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. या कामासाठी प्रशासनाच्या सहकार्याने काँग्रेस, युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्तेही मोठा हातभार लावत आहेत.रेड झोनमधून येण्यास परवानगी नाहीचगडचिरोली ग्रीन झोनमध्ये येते. या ठिकाणी सद्यातरी रेड झोनमधून प्रवाशांना येण्यास परवानगी नाही, असे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी स्पष्ट केले. शासनाकडून रेड झोनमधील हालचालींवर निर्बंध घातलेले आहेत. त्या ठिकाणाहून कोणत्याही व्यक्तीला सध्या परवानगी देण्यात येणार नाही. मात्र त्यांनी दिलेल्या संपर्कावर माहिती नोंदवावी. भविष्यात याबाबत निर्णय घेण्यासाठी सदर माहिती आवश्यक ठरणार आहे. जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या ०७१३२-२२२०३१ या क्र मांकावर दूरध्वनी करून अधिक माहिती देऊ आणि घेऊ शकता.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या