लहान बालकांना प्रचंड यातना : रामपुरी शाळेतील वर्गखोलीत पंखेही बंदगडचिरोली : गडचिरोली शहरात अंगणवाडीत जाणाऱ्या ० ते ५ वयोगटातील बालकांचे आधारकार्ड काढण्याची मोहीम राबविली जात आहे. गडचिरोली शहरातील रामपुरी नगर परिषदेत शाळेत यासाठी केंद्र देण्यात आले आहे. मात्र या शाळेत कुठल्याही सोयीसुविधा नाही. विजेची कशीतरी व्यवस्था करून येथे केंद्र चालविले जात आहे. पिण्याच्या पाण्याची सुविधाही याठिकाणी करण्यात आली नाही. आधारकार्ड काढण्याचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गर्मीत बसून दिवसभर काम करावे लागत आहे. वर्गखोल्यांमधील पंखे बंद अवस्थेत आहे. आधार कार्डाचे काम चालविणाऱ्या माणसाने छोटासा पिवळा लाईट लावून रात्री उशीरापर्यंत अंधाऱ्या खोलीत हे काम चालविले. नगर परिषद शाळेच्या परिसरात एकही लाईट नाही. चंद्राच्या प्रकाशात लोक वाट काढत घराचा रस्ता पकडत होते, अशी परिस्थिती रामपुरी शाळेच्या या आधार कार्ड केंद्रावर दिसून आली.लहान बालकांना घेऊन येणाऱ्या आईलाही कमालीच्या यातना सहन कराव्या लागत आहे. लहान मुलांच्या आधारकार्डाची तत्काळ गरज नसताना प्रशासन असे कार्यक्रम राबविते कशासाठी, असा प्रश्न या ठिकाणी अनेक पालकांनी उपस्थित केला आहे. नगर पालिकेच्या सुविधा नसलेल्या शाळांमध्ये असले शिबिर आयोजित करू नये, अशी मागणी पालकांनी केली आहे. जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांनी या बाबीची गंभीर दखल घेऊन असे केंद्र बंद करावे, अशी पालकांची मागणी आहे. (जिल्हा प्रतिनिधी)बालकांसाठी पालकांची परेड; आई खाद्य पदार्थाचे डबे घेऊन केंद्रावरअंगणवाडी महिलेकडून या शिबिराची माहिती देण्यात आल्याने प्रचंड गर्दी सकाळपासून येथे उसळलेली असते. रात्री उशिरापर्यंत पालक आपल्या मुलांना खाण्यासाठी डब्बा, पाण्याची व्यवस्था आदी सोबत घेऊन उपस्थित असतात. अनेकांना आपली रोजी बुडवूनही येथे यावे लागते. त्यामुळे सरकारच्या या कार्यक्रमाप्रती प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
अंधाऱ्या खोलीत आधार कार्ड काढण्याचे काम
By admin | Updated: March 4, 2015 01:56 IST