शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
2
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
3
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
4
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
5
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
6
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
7
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
8
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!
9
परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाहन ताफ्याबाहेर पडले, यंत्रणा गोंधळात, नेमकं काय घडलं?
10
भ्रष्टाचाराची हद्द! सोने,४ लाख घेऊनही ५ लाखांची मागणी; 'API'सह चार पोलिस 'ACB'च्या ताब्यात
11
Delhi Blast: PM मोदी ॲक्शन मोडवर, थोड्याच वेळात हायलेव्हल बैठक; जयशंकर, डोवाल यांच्यासह... 
12
Delhi Blast : पतीच्या अंत्यसंस्कारावरुन सुनेचं सासूशी कडाक्याचं भांडण, अखेर...; दिल्ली स्फोटात गमावला जीव
13
GST कपातीचा परिणाम; ऑक्टोबरमध्ये महागाई दर 10 वर्षांतील नीचांकी पातळीवर
14
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
15
थरारक! लग्नातच नवरदेवावर चाकूने जीवघेणा हल्ला; ड्रोनद्वारे आरोपीचा २ किमी पाठलाग केला, मग...
16
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
17
Astro Tips: दर गुरुवारी औदुंबराला पाणी घालण्याचे आध्यात्मिक आणि वैद्यकीय लाभ वाचून चकित व्हाल!
18
अरे व्वा...! या ढासू 7-सीटर SUV वर तब्बल ₹1.50 लाखांचा कॅश डिस्काउंट; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
19
'त्या' पोस्टरनं उलगडलं जैशचं टेरर मॉड्युल; समोर आला फोटो, एक महिना आधीच पाकिस्तानातून..
20
Bihar Election Exit Poll: मैथिली ठाकूर हरणार की जिंकणार, एक्झिट पोलचा अंदाज काय?

महिलांनी पकडली छत्तीसगडी दारू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 22:51 IST

दारूबंदी असतानाही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात छत्तीसगडमध्ये निर्मित हलक्या प्रतिची दारू सर्रास येत असल्याचे पुन्हा एकदा उघडकीस झाले. धानोरा तालुक्यातील मुरूमगाव येथे बुधवारच्या रात्री दारूमुक्त महिला संघटनेच्या सदस्यांनी पुढाकार घेत व्यंकटेश बैरवार यांच्या शेताजवळून एक ट्रॅक्टरभर ‘गोवा’ कंपनीची छत्तीसगडी दारू जप्त केली. या दारूची किंमत ४ लाख ३५ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.

ठळक मुद्देचार लाखांचा माल जप्त : दुसरा ट्रॅक्टर व एक वाहन पळून जाण्यात यशस्वी

लोकमत न्यूज नेटवर्कमुरूमगाव : दारूबंदी असतानाही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात छत्तीसगडमध्ये निर्मित हलक्या प्रतिची दारू सर्रास येत असल्याचे पुन्हा एकदा उघडकीस झाले. धानोरा तालुक्यातील मुरूमगाव येथे बुधवारच्या रात्री दारूमुक्त महिला संघटनेच्या सदस्यांनी पुढाकार घेत व्यंकटेश बैरवार यांच्या शेताजवळून एक ट्रॅक्टरभर ‘गोवा’ कंपनीची छत्तीसगडी दारू जप्त केली. या दारूची किंमत ४ लाख ३५ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.प्राप्त माहितीनुसार, येथून काही अंतरावर असलेल्या रिडवाईच्या जंगलाकडील व्यंकटेश बैरवार यांच्या शेताजवळ दारूच्या बाटल्यांनी भरलेला एक ट्रॅक्टर चिखलात फसल्याची माहिती गावातील महिलांना समजली. रात्री ८ वाजले होते, पण त्यांनी घटनास्थळी जाण्याचा निर्धार केला. सरपंच प्रियंका नैताम, उपसरपंच शिवप्रसाद गवरना, मुनीर शेख यांच्यासह दारूमुक्ती महिला संघटनेच्या अध्यक्ष सायराबेगम शेख, सचिव लिलाबाई धुरकुरिया, बिंदीया मडकाम, पुष्पा कोटवार, प्रतिभा उईके, भाविका अतला, निराशा कुंजाम, आसोबाई हिड्डा, अनाबाई हिड्डा, बुधोबाई भोयर आदी महिलांनी हिंमत दाखवत जंगलाच्या दिशेने कुच केले. सदर महिलांची ती हिंमत पाहून दारू तस्करांनी त्यांना धमकावण्याचा आणि त्यांच्या अंगावर ट्रॅक्टर चालविण्याचाही प्रयत्न केला. पण महिलांनी हिंमत हारली नाही. दरम्यान जिल्हा परिषद सदस्य लता पुनघाटे यांनी याबाबतची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिली. पण तोपर्यंत घटनास्थळावरून दारूच्या बाटल्यांनी भरलेला एक ट्रॅक्टर आणि एक पीकअप वाहन पसार झाले. तसेच फसलेल्या ट्रॅक्टरमधील दारूच्या बाटल्या तिथेच फेकून देण्यात आल्या. पहाटे दुसरा एक ट्रॅक्टर नेऊन महिलांनी त्या दारूच्या बाटल्या जप्त केल्या.पोलिसांवर महिलांचा रोषया भागात छत्तीसगडी दारूची मोठ्या प्रमाणात आयात होते. स्थानिक तस्काराकडून ही दारू गडचिरोलीपर्यंत पोहोचविली जाते. परंतू मुरूमगाव पोलीसच त्या तस्करीला संरक्षण देत असल्याचा आरोप महिलांनी केला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणीही त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली.