शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
2
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
3
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
4
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
5
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
6
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
7
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
8
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
9
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
10
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
11
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
12
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
13
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
14
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
15
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
16
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
17
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
18
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
19
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
20
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस

प्लाटून कमांडरसह एक महिला नक्षलवादी ठार, घातपाताचा डाव उधळला; जंगलात चकमक 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 6:06 AM

डीआयजी संदीप पाटील यांच्यासह एएसपी (ऑपरेशन) मनीष कलवानिया यांनी सांगितले की, धानोरा तालुक्यातील सावरगाव पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील जंगलात नक्षलवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथक शोधमोहीम राबवत होते.

 गडचिरोली: पोलिसांचे सी-६० पथक आणि नक्षलवाद्यांमध्ये गुरुवारी सकाळी उडालेल्या चकमकीत नक्षल्यांच्या टिपागड एरिया कमिटीचा प्लाटून १५ चा कमांडर राजा ऊर्फ रामसाई नोहरू मडावी व एक महिला नक्षलवादी ठार झाले. त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असून दोघांवर मिळून १४ लाखांचे बक्षीस होते.डीआयजी संदीप पाटील यांच्यासह एएसपी (ऑपरेशन) मनीष कलवानिया यांनी सांगितले की, धानोरा तालुक्यातील सावरगाव पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील जंगलात नक्षलवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथक शोधमोहीम राबवत होते. सकाळी ६ ते ६.३० जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी त्यांच्या दिशेने गोळीबार केला. पोलीस पथकाने प्रत्युत्तर दिले. त्यात दोन नक्षल्यांचा खात्मा झाला. घटनास्थळावरून एसएलआर रायफल, ८ एमएम रायफल, कुकर बॉम्ब व आईडी अशा स्फोटक साहित्यांसह नक्षलवाद्यांच्या दैनंदिन वापराचे साहित्य जप्त केले. 

१४ लाखांचे होते बक्षीसदोघांचेही मृतदेह हेलिकॉप्टरने गडचिरोलीत आणून ओळख पटविण्यात आली. त्यातील मृत नक्षल कमांडर राजा मडावी (३३) याच्यावर खून, जाळपोळ, चकमक असे ४४ गुन्हे दाखल होते. त्यामुळे त्याच्यावर १२ लाखांचे बक्षीस होते. तसेच रनिता ऊर्फ पुनिता चिपळूराम गावडे (२८) हिच्यावर खून, चकमक, शस्त्र व स्फोटक कायद्यासह ९ गुन्हे दाखल होते. तिच्यावर २ लाखांचे बक्षीस होते.उत्तर गडचिरोलीत चळवळ खिळखिळीकाही दिवसांपूर्वीच टिपागड एरिया कमिटीचा प्लाटून कमांडर भास्कर मारला गेला होता. त्यानंतर या भागाची जबाबदारी राजा ऊर्फ रामसाई मडावी याच्याकडे आली होती. आता तोसुद्धा मारल्या गेल्यामुळे उत्तर गडचिरोली भागातून नक्षल चळवळ खिळखिळी झाल्याचे पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले. 

टॅग्स :naxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोलीPoliceपोलिस