शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

जादूटोनाच्या संशयावरून हत्या

By admin | Updated: August 17, 2016 01:33 IST

जादूटोना केल्याच्या संशयावरून तालुक्यातील बटेली या गावातील मुन्सी मज्जी आत्राम (५०) या इसमाची गावातील ...

बटेली गावातील घटना : मारहाण करणाऱ्या पाच आरोपींवर गुन्हा दाखल भामरागड : जादूटोना केल्याच्या संशयावरून तालुक्यातील बटेली या गावातील मुन्सी मज्जी आत्राम (५०) या इसमाची गावातील पाच लोकांनी मिळून हत्या केल्याची घटना सोमवारी घडली. राजू इरपा नरोटी, पांडू आत्राम, मधुकर आत्राम, विष्णू मडावी, सतू झुरू मडावी अशी आरोपींची नावे आहेत. मृतक मुन्सी आत्राम हा गावातील नागरिकांना जादूटोना करतो. त्यामुळे गावातील नागरिकांचे आरोग्य बिघडत चालले आहे, असा सशंय गावकऱ्यांकडून व्यक्त केला जात होता. जादूटोनाच्या संशयावरूनच आरोपी व मृतक मुन्सी आत्राम यांच्यामध्ये भांडण झाले. भांडणादरम्यान आरोपींनी मुन्सीला बेदम मारहाण केली. या मारहाणीमध्ये मुन्सीचा मृत्यू झाला. याबाबतची तक्रार मुन्सीच्या नातेवाईकांनी ताडगाव पोलीस मदत केंद्रात दाखल केली. पोलिसांनी तपासानंतर आरोपींविरोधात कलम ३०२, २०१ अन्वये गुन्हा दाखल केला. मुन्सीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी भामरागड येथे मंगळवारी आणण्यात आला. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आला. मृतकाला दोन पत्नी आहेत. यातील पहिल्या पत्नीस तीन मुले, एक मुलगी व मोठ्या पत्नीस एक मुलगी असा आप्त परिवार आहे. दुर्गम भागात अज्ञानामुळे जादूटोना केल्याच्या संशयावरून मारहाणीच्या घटना यापूर्वीसुध्दा घडल्या आहेत. विशेष करून ताडगावचा परिसरातील जंगल भागात वास्तव्यास असलेल्या गावांमध्ये या घटना अधिक घडतात. (तालुका प्रतिनिधी)