शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

मित्राच्या लग्नकार्याला येण्याची स्वरूपची इच्छा राहिली अपूर्णच!

By admin | Updated: March 24, 2015 01:49 IST

अजय शेंडे नामक मित्राचा ३० एप्रिल २०१५ रोजी गडचिरोलीत लग्न समारंभ आयोजित

दिलीप दहेलकर ल्ल गडचिरोलीअजय शेंडे नामक मित्राचा ३० एप्रिल २०१५ रोजी गडचिरोलीत लग्न समारंभ आयोजित करण्यात आला आहे. शनिवारी स्वरूप अमृतकर याची त्याचा मित्र अजय शेंडे याच्याशी भेट झाली. यावेळी स्वरूपने अजयला तुझ्या लग्नात मी नक्की येतो. डिजेची व्यवस्था आहे काय? असे विचारत लग्न वरातीत नाचण्याची स्वरूपने ईच्छा व्यक्त केली होती. मात्र नियतीने आपला डाव साधून स्वरूपला हिरावून घेतले. त्यामुळे त्याची इच्छा अपूर्ण राहिली. दोघे आत्राम याच्यावरही नियतीने डाव साधल्याने त्यांच्या बालिकांचे पितृछत्र हरविले. वयाने अत्यंत लहान असलेल्या या निरागस बालिकांच्या जीवनात अंध:कार पसरला आहे.दोघे आत्राम हा युवक एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम कांदोली बुर्गी या गावातील राहणारा होता. एटापल्ली तालुका मुख्यालयापासून २५ किमी तर पेरमिलीवरून १२ किमी अंतरावर कांदोली बुर्गी हे गाव आहे. दोघे याला एक मोठा भाऊ राजू व तीन बहिणी आहेत. तीन बहिणींचे लग्न झाले. त्यानंतर मोठ्या भावापाठोपाठ दोघे याचेही लग्न झाले.गरीब कुटुंबाला आधार व्हावा म्हणून कोणत्याही सोयीसुविधा नसलेल्या अतिदुर्गम गावात राहणाऱ्या दोघे याने पोलीस भरतीची तयारी सुरू केली. त्यांच्या परीश्रमाला यश येऊन सन २००६ मध्ये दोघे आत्राम हा जिल्हा पोलीस दलात दाखल झाला. सी-६० पथकात कार्यरत राहून तो नक्षल्यांशी लढत राहिला. दोघे व रनव या दाम्पत्याला दोन मुली आहेत. पूजा ही १० वर्षाची मोठी मुलगी असून ती इयत्ता दुसरीत शिकत आहे. आचल नावाची दुसरी मुलगी पाच वर्षाची असून ती नर्सरीमध्ये शिकत आहे. दोघेच्या जाण्याने वृध्द मातापित्यांचा आधार हिरावला. शहीद स्वरूप अमृतकर याला दोन भाऊ आहेत. त्याचे दोन्ही भाऊ पोलीस दलातच कार्यरत आहेत. कल्पना डोमळे (अमृतकर) ही त्याची आई येवली येथील जि.प. प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहे. स्वरूपच्या आईनेच लहानपणापासून या तिन्ही मुलांचा सांभाळ केला. तो नेहमी मित्र परिवारात वावरायचा. बॉल बॅडमिंटनचा तो चांगला खेळाडू होता. स्वरूप हा २००९ मध्ये पोलीस दलात दाखल झाला. पोलीस दलात दाखल झाल्यापासून तो सी-६० पथकामध्ये कार्यरत होता.