शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्यविषयक समस्या सोडविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 01:00 IST

ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र व स्वास्थ्य केंद्रात डॉक्टर व परिचारिकांची बहुसंख्य पदे रिक्त असल्याने स्थानिक नागरिकांना आरोग्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. ही बाब गंभीर असून आरोगयाच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करणार, असे आश्वासन जि. प. अध्यक्ष योगीता भांडेकर यांनी दिले.

ठळक मुद्देजि. प. अध्यक्षांचे प्रतिपादन : जिल्हास्तरीय जनसंवाद कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र व स्वास्थ्य केंद्रात डॉक्टर व परिचारिकांची बहुसंख्य पदे रिक्त असल्याने स्थानिक नागरिकांना आरोग्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. ही बाब गंभीर असून आरोगयाच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करणार, असे आश्वासन जि. प. अध्यक्ष योगीता भांडेकर यांनी दिले.आम्ही आमच्या आरोग्यासाठी, इंडियन इन्स्टिट्युट आॅफ यूथ वेलफेअर, साथी पुणे व राष्टÑीय आरोग्य अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने जि. प. च्या वीर बाबुराव शेडमाके सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय आरोग्य हक्क जनसंवाद कार्यक्रमात त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जि. प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार, जि. प. सदस्य अ‍ॅड. राम मेश्राम, मनीषा दोनाडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर, पं. स. सदस्य अशोक खेवले, भाऊसाहेब अहेर उपस्थित होते.शुभदा देशमुख यांनी आरोग्य सेवांवर लोकाधारीत देखरेख व नियोजन प्रक्रियेची मांडणी केली. रिक्त पदे, रूग्णांना मिळणारी अपुरी सेवा, आरोग्य यंत्रणेला भेडसावणाऱ्या समस्या, औषधांचा तुटवडा, उपकेंद्र व प्रा. आ. केंद्र गळती, पिण्याचा पाण्याचा प्रश्न, उपकेंद्र व अंगणवाडी केंद्रांचे नवीन बांधकाम करण्याचे प्रस्ताव, १०८ रूग्णवाहिकेविषयी अडचणी मांडण्यात आल्या. यासोबतच आरोग्य सेवांवर लोकाधारीत देखरेख व नियोजन प्रक्रिया नागरिकात रूजविण्यासाठी ग्राम आरोग्य, पाणीपुरवठा, पोषण व स्वच्छता समिती सदस्यांच्या प्रशिक्षणाचा प्रस्ताव मांडण्यात आला.यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर यांनी औषधांचा तुटवडा ही समस्या राज्यस्तरावरून असल्यामुळे डी. पी. डी. सी. च्या निधीतून औषध खरेदी करून जिल्ह्यात वितरित करण्यात येत असल्याचे सांगत रिक्त पदांसाठी शासनाकडे सतत पाठपुरावा करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी जि. प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार, जिल्हा आरोग्य अधिकारी शशिकांत शंभरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी लामतुरे यांनीही मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे संचालन यशवंत पाठणकर, प्रास्ताविक मनोहर हेपट तर आभार जैनूल शेख यांनी मानले. 

टॅग्स :zpजिल्हा परिषद