शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

क्रांतीकारी गुंडाधूरचे स्वप्न जिल्ह्यात पूर्णत्वास येणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 01:35 IST

छत्तीसगड राज्यातल्या बस्तर जिल्ह्यात आदिवासींचे आदर्श क्रांतीकारी जमीनदार गुंडाधूर यांनी आपल्या समाजबांधवांवर (आदिवासींवर) इंग्रजांकडून होणाऱ्या अत्याचाराविरूद्ध १९१० मध्ये बंड पुकारून त्यांना सळो की पळो करून सोडले होते.

ठळक मुद्दे१०९ वा भूमकाल दिन विशेष

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : छत्तीसगड राज्यातल्या बस्तर जिल्ह्यात आदिवासींचे आदर्श क्रांतीकारी जमीनदार गुंडाधूर यांनी आपल्या समाजबांधवांवर (आदिवासींवर) इंग्रजांकडून होणाऱ्या अत्याचाराविरूद्ध १९१० मध्ये बंड पुकारून त्यांना सळो की पळो करून सोडले होते. बस्तरमधील तो भूमकाल विद्रोह सतत ७५ दिवस चालू होता. त्या विद्रोहाची सुरूवात १० फेब्रुवारीला झाली होती. आजही आदिवासींवरील अत्याचार सुरूच आहेत. फक्त अत्याचार करणारे बदलले आहेत. रविवारच्या भूमकाल दिनाच्या निमित्ताने आदिवासींवरील अत्याचाराविरूद्ध पुन्हा एकदा आवाज उठविण्यासाठी आणि क्रांतीकारी गुंडाधूरने बघितलेले आदिवासींच्या विकासाचे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी कोणी पुढाकार घेईल का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.आजपासून १०९ वर्षांपूर्वी गुंडाधूर यांनी आपल्या आदिवासी बांधवांवर होणाºया अत्याचाराविरूद्ध १० फेब्रुवारी १९१० रोजी पहिला आवाज उठविला होता. त्यांनी आदिवासींना सोबत घेऊन इंग्रजांच्या अत्याचाराला विरोध केला. त्यावेळी कोणताही विद्रोह शांत करण्यास इंग्रजांना फारसा वेळ लागत नव्हता. परंतू बस्तरमधील भूमकाल विद्रोह हा सतत ७५ दिवस चालू होता. इंग्रजांनी ५०० बंदूकधारी पाठवूनसुद्धा विद्रोह शांत होत नव्हता. १६ फेब्रुवारी ते ३ मे १९१० पर्यंत विद्रोह शांत करण्याचे प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर इंग्रजांनी निर्दोष आदिवासींवर मोठ्या प्रमाणात अत्याचार सुरू केले. नेतानार जवळील अलनारच्या जंगलात २१ आदिवासींना पकडून त्यांची निर्घृणपणे हत्या केली. यामुळे आदिवासी व गुंडाधूर यांनी चिडून जाऊन इंग्रजांवर हल्ला केला. यात अनेक इंग्रज आणि आदिवासीही मारले गेले. पण गुंडाधूर हा इंग्रजांच्या हाती लागला नाही किंवा गुंडाधूर हा कोण हे इंग्रजांना समजले नाही.आदिवासींना सुखी, समाधानी जीवन जगायला मिळावे म्हणून ते स्वप्न क्रांतीकारी गुंडाधूरने पाहिले होते ते स्वप्न आजही अधुरेच आहे. इंग्रजांची जागी आज नक्षलवाद्यांनी घेतली आहे. त्यांच्यामुळे जिल्ह्यातील आदिवासी समाजाची प्रगती खुंटली आहे. आदिवासी मुलांच्या शिक्षणाला विरोध, नोकरी, रोजगाराला विरोध, गावात होणाºया रस्ते बांधकाम, शासकीय कार्यालयांना विरोध, शासनस्तरावरून आदिवासींना मिळणाºया सोयीसुविधांना विरोध, आणि महत्वाचे म्हणजे समाजाच्या विकासासाठी धडपड करणाºया आदिवासींना खबरी ठरवून त्यांच्या हत्या करणे अशा हिंसक घटना घडवून नक्षलवादी आदिवासींच्या प्रगतीमधील मोठा अडथळा ठरत आहेत.आदिवासींना जल, जंगल, जमिनीचे स्वप्न दाखविणाऱ्यांनी २० दिवसांत ८ आदिवासी नागरिकांनी हत्या केली. कसनासूरच्या नागरिकांना त्यांच्याच गावातून बेघर करण्यात आले. शेवटी त्यांना ताडगाव पोलीस मदत केंद्रात आश्रयाला यावे लागले. जिल्ह्यातील आदिवासी समाजावरील या अत्याचाराविरूद्ध बंड पुकारण्यासाठी भूमकाल दिनाच्या निमित्ताने आदिवासी समाजाने एकजूटता दाखवून गुंडाधूरचे स्वप्न साकार करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पोलीस विभागाने केले आहे.