शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

निवडणुका पुढे ढकलण्यासाठी आयोगाला विनंती करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2021 5:00 AM

देसाईगंज - गडचिरोली रेल्वेमार्गासाठी राज्य सरकारने आपला वाटा दिला नसल्याबद्दल विचारले असता, या कामासाठी केंद्राने तरी आपला वाटा दिला आहे का? असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. आधीच काेरोनामुळे आर्थिक स्थिती बिघडली आहे. त्यात केंद्राने राज्याच्या हक्काचे जीएसटीचे पैसे दिले नाहीत. या मार्गासाठी राज्य सरकार आपला वाटा देईलच, पण केंद्राने आधी आपला वाटा देऊन जमीन अधिग्रहणाचे काम सुरू करावे, अशी सूचना त्यांनी केली.

 लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणावर आक्षेप घेणारे याचिकाकर्ते हे भाजपचे धुळे येथील पदाधिकारी आहेत. ओबीसींना आरक्षण मिळू नये, यासाठी भाजपनेच रचलेले हे षड्यंत्र आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर घेतलेला हा निर्णय दुर्दैवी असून, केवळ ओबीसींच्या हक्कावर गदा आणण्याऐवजी कायदेशीर मार्गाने हे आरक्षण लागू होत नाही तोपर्यंत निवडणुकाच घेऊ नये, अशी विनंती सरकारच्या वतीने निवडणूक आयोगाकडे केली जाईल, अशी माहिती ओबीसी कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार यांनी येथे पत्रपरिषदेत दिली. यावेळी ना. वडेट्टीवार म्हणाले, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस, पंकजा मुंडे यांनी ६ पत्र पाठवूनही त्यांना केंद्र सरकारने इम्पेरिकल डेटा दिला नाही. त्यावेळी त्यांनी आयोग का नेमला नाही आणि डेटा का बनविला नाही? आता केंद्र सरकार कोणत्याही परिस्थितीत जातनिहाय जनगणना करण्यास तयार नाही. यावरून सरकारची ओबीसींबद्दलची भूमिका काय आहे ते कळते. आम्ही दिलेले आरक्षण जिल्हानिहाय ५० टक्क्यांच्या आतच बसविले आहे. असे असताना ते रद्द करणे दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले. नगर पंचायत निवडणुकीत महाआघाडीतील पक्ष कुठे एकत्रीत तर कुठे स्वतंत्र लढणार आहेत. स्थानिक पातळीवरील समिकरणे पाहून आणि प्रदेशाध्यक्षांच्या सूचनेनुसार त्याबाबतचा निर्णय घेण्यात आला असल्याचे यावेळी वडेट्टीवार यांनी सांगितले.पत्र परिषदेला युवक काॅंग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, प्रदेश सरचिटणीस डाॅ. नामदेव उसेंडी, सचिव पंकज गुड्डेवार, नगरसेवक तथा शहर अध्यक्ष सतीश विधाते, जि.प. सदस्य ॲड. राम मेश्राम, कुणाल पेंदाेरकर आदी उपस्थित हाेते. 

लोकसभेवरील काॅंग्रेसचा दावा कायमगेल्या महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी गडचिरोली दौऱ्यात गडचिरोली लोकसभा क्षेत्रातून आता राष्ट्रवादी काँग्रेस लढेल, असे सांगितले होते. त्यावर बोलताना ना. वडेट्टीवार यांनी आघाडीत ही जागा काँग्रेसच्या वाट्याला आहे आणि त्यावरील पक्षाचा दावा यापुढेही कायम राहील, असे सांगितले. 

रेल्वेसाठी केंद्र केव्हा पैसे देणार?देसाईगंज - गडचिरोली रेल्वेमार्गासाठी राज्य सरकारने आपला वाटा दिला नसल्याबद्दल विचारले असता, या कामासाठी केंद्राने तरी आपला वाटा दिला आहे का? असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. आधीच काेरोनामुळे आर्थिक स्थिती बिघडली आहे. त्यात केंद्राने राज्याच्या हक्काचे जीएसटीचे पैसे दिले नाहीत. या मार्गासाठी राज्य सरकार आपला वाटा देईलच, पण केंद्राने आधी आपला वाटा देऊन जमीन अधिग्रहणाचे काम सुरू करावे, अशी सूचना त्यांनी केली.

 

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणVijay Vadettiwarविजय वडेट्टीवार