लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : सिरोंचा शहरापासून अवघ्या दीड किमी अंतरावरील धर्मपुरी येथे प्राणहिता नदीवर पूल झाल्याने आदिलाबाद जिल्ह्यासह निकटवर्तीय जिल्ह्यातील नागरिकांची वर्दळ वाढली आहे. मंचेरियाल, चन्नूर, कोल्लूर, रामपूर व देवलाडा मार्गे रात्रंदिवस रहदारी सुरू आहे. परिणामी गेल्या काही दिवसांपासून सिरोंचा शहरात प्रवाशांची गर्दी वाढली आहे. मात्र येथे सुसज्ज व प्रशस्त बसस्थानक नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.तालुका मुख्यालयी सर्व सोयीसुविधायुक्त बसस्थानकाची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी जनतेकडून जोर धरत आहे. मंचरियाल, चन्नूर, कोल्लूर, रामपूर व देवलाडा येथील नागरिकांनी सध्या तेलंगणा राज्यातील मध्यम व मोठ्या शहराचे अंतर लांब पडत आहे. त्यामुळे लहान-सहान किरकोळ साहित्य खरेदीसाठी सिरोंचा शहर सोयीस्कर आहे. गोदावरी नदीवरील पूल तीन वर्षांपूर्वी झाला. तेव्हापासून कालेश्वर, महादेवपूर, गारेपल्ली व भूपालपल्ली मार्गे तेलंगण आंध्रवासियांची वर्दळ वाढली आहे. सुरूवातीच्या काही महिन्यात या दोन्ही राज्यातील बससेवेमुळे नागरिकांना दिलासा मिळाला. शिवाय त्यांच्या महसुलातही भर पडली. मात्र सिरोंचा येथे प्रशस्त बसस्थानक नसल्याने चालक, वाहकांसह प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. प्रशस्त बसस्थानक निर्मितीबाबत येथील विभागीय नियंत्रक इच्छूक नाहीत. बसफेऱ्यांची संख्या रोडावत असल्याने निकटवर्तीय आंध्रप्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड या तिन्ही राज्यातील प्रवाशांची गैरसोय होत आहे.रहदारीला अडथळा, रस्ता रुंदीकरणाची गरजस्थानिक व बाहेरगावच्या लोकांची येथे सदैव वर्दळ असते. मात्र रस्त्याची रूंदी भूमी अभिलेख विभागाच्या नगर भूमापन नकाशाप्रमाणे नसल्याने वाहनांच्या रहदारीला कमालीचा त्रास होत आहे. २०० मीटर परिसरात नो-पार्र्किंग झोनचा नियम असूनही या नियमाचे सर्रास उल्लंघन होत आहे. भूमापन नकाशात आलापल्ली मार्गाची रूंदी २१.५ मीटर तर असरअल्ली मार्गाची रूंदी २० मीटर आहे. येथे रुंद रस्त्याचे बांधकाम करून दुभाजक उभारण्यात यावे, सर्व सोयीसुविधायुक्त बसस्थानक निर्माण करावे, अशी मागणी होत आहे.
बसस्थानकाचे बांधकाम के व्हा होणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 22:27 IST
सिरोंचा शहरापासून अवघ्या दीड किमी अंतरावरील धर्मपुरी येथे प्राणहिता नदीवर पूल झाल्याने आदिलाबाद जिल्ह्यासह निकटवर्तीय जिल्ह्यातील नागरिकांची वर्दळ वाढली आहे. मंचेरियाल, चन्नूर, कोल्लूर, रामपूर व देवलाडा मार्गे रात्रंदिवस रहदारी सुरू आहे. परिणामी गेल्या काही दिवसांपासून सिरोंचा शहरात प्रवाशांची गर्दी वाढली आहे. मात्र येथे सुसज्ज व प्रशस्त बसस्थानक नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.
बसस्थानकाचे बांधकाम के व्हा होणार?
ठळक मुद्देप्राणहिता व गोदावरी नदीवरील पूल : तीन राज्यीय रहदारी वाढली