शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

अदानी-अंबानीसाठी वनजमीन, मग रेल्वेमार्गासाठी का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 00:17 IST

वडसा ते गडचिरोली रेल्वेमार्गाच्या मंजुरीच्या कोरड्या गप्पाच मारल्या जात आहे. प्रत्यक्षात या मार्गाच्या उभारणीचे काम पुढे सरकतच नाही. वनविभाग जमीन देण्यास तयार नाही.

ठळक मुद्देनाना पटोले यांचा सवाल : देसाईगंजमध्ये काँग्रेसकडून सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : वडसा ते गडचिरोली रेल्वेमार्गाच्या मंजुरीच्या कोरड्या गप्पाच मारल्या जात आहे. प्रत्यक्षात या मार्गाच्या उभारणीचे काम पुढे सरकतच नाही. वनविभाग जमीन देण्यास तयार नाही. पण या सरकारला अदानी-अंबानीसारख्या उद्योगपतींना वनजमीन देता येते, पण सामान्य माणसाच्या उपयोगाच्या रेल्वेमार्गासाठी जमीन देता येत नाही, अशी टिका काँग्रेस नेते माजी खा.नाना पटोले यांनी येथे केली.काँग्रेस पक्षाच्या शेतकरी-शेतमजूर सेलच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर देसाईगंजमध्ये प्रथम आगमनानिमित्त त्यांचा येथील राजीव गांधी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पटोले यांच्यासह काँग्रेसचे गडचिरोली जिल्हा प्रभारी सुरेश भोयर आणि प्रदेश सचिव रविंद्र भोयर यांचाही माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी यांनी शाल-श्रीफळ देऊन सत्कार केला.यावेळी बोलताना पटोले यांनी भाजप सरकारवर कठोर टिका करताना पेट्रोल-डिझेलच्या किमतीबाबत सरकार किती उदासीन आहे हे सांगितले. येणाऱ्या निवडणुकीत जनता याचा जाब विचारेल, असे ते म्हणाले. विद्यार्थ्यांनी शिकून स्वयंरोजगारावर भर द्यावा तसेच शेतकºयांनी शेतीपूरक व्यवसायावर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक जेसा मोटवानी यांनी केले. संचालन प्रा.ए.जी. शिवणकर यांनी तर आभार प्रा.सय्यद यांनी मानले.या कार्यक्रमाला माजी खासदार मारोतराव कोवासे, माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश इटनकर, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष परसराम टिकले, अ‍ॅड.एन.डी.किरसान, नगरसेवक हरिष मोटवानी, आरिफ खानानी, गणेश फाफट, अ‍ॅड.संजय गुरू, ईश्वर कुमरे, छोटे मस्जिद भोला, राजू रासेकर, प्रकाश समर्थ, माजी नगरसेवक शहेजाद शेख, तसेच जिल्हा महिला उपाध्यक्ष निलोफर शेख, तालुका अध्यक्ष आरती लहरी, नगरसेविका उत्तरा तुमराम, भावना तलमले आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

टॅग्स :railwayरेल्वेforest departmentवनविभाग