शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

रानटी हत्तींचा पिकांमध्ये धुडगूस; शेतकऱ्यांच्या डाेळ्यांत पाणी, पीक हाती येण्याच्या कालावधीतच नासधूस

By गेापाल लाजुरकर | Updated: November 10, 2023 19:53 IST

हत्तींच्या कळपाकडून पिकांची नासधूस केली जात आहे. 

गडचिराेली : जिल्ह्यात गेल्या दाेन वर्षांपासून रानटी हत्तींच्या कळपाकडून खरीप, रब्बी व उन्हाळी अशा तिन्ही हंगामांतील पिकांची नासधूस केली जात आहे. यावर्षी उन्हाळ्यात छत्तीसगडमध्ये परत गेलेल्या हत्तींनी तीन महिन्यांपूर्वी पुन्हा गडचिराेली जिल्ह्यात प्रवेश केला. तेव्हापासून हत्तींच्या कळपाकडून पिकांची नासधूस केली जात आहे. 

आतातर हाती येणाऱ्या धान पिकाची नासधूस रानटी हत्ती करीत असल्याने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले आहे. हात पीक येण्याऐवजी डाेळ्यांत पाणी आहे. गडचिराेली जिल्ह्यातील वडसा वनविभागात २३च्या संख्येने असलेल्या रानटी हत्तींच्या कळपाने सर्वाधिक नासधूस केली. शेतीपीक, मनुष्यहानी, साहित्य व घरांचीही पाडापाडी करून लाेकांचे नुकसान केले. 

एकट्या वडसा वनविभागांतर्गत एकूण ४५४ प्रकरणात १ काेटी ११लाख १५ हजार ९७२ रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आली आहे. गडचिराेली वनविभागातील नुकसानभरपाईसुद्धा ३० लाखांच्या आसपास आहे.

पीक नुकसानाची ५६ लाखांवर भरपाई -रानटी हत्तींनी वडसा वनविभागात यावर्षी ४३७ शेतकऱ्यांच्या १२०.२७ हेक्टर क्षेत्रावरील धान व अन्य पिकांचे नुकसान केले. या नुकसानीपाेटी शेतकऱ्यांना ५३ लाख ९८, ९७२ रुपयांची नुकसानभरपाई वितरित करण्यात आली. गेल्या आठ दिवसांत आणखी ५० ते ६० शेतकऱ्यांच्या धान पिकाची नासधूस हत्तींनी केली. गडचिराेली वन विभागातही हत्तींनी ८० शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान केले. एकूण ५६ लाखांवर भरपाई शेतकऱ्यांना देण्यात आली.

दाेघांचा घेतला बळी -रानटी हत्तींनी यावर्षी दाेन लाेकांचा बळी घेतला. यामध्ये आरमाेरी वनपरिक्षेत्रातील पळसगाव क्षेत्रात वनाधिकाऱ्यांचे वाहनचालक, तर पाेर्ला वनपरिक्षेत्रातील दिभना येथील एका शेतकऱ्याचा समावेश आहे. यापूर्वी हत्तींनी काेरची तालुक्यातील एक महिला व एक पुरुष, तर धानाेरा तालुक्यातील एका पुरुषाचा बळी घेतला हाेता. आतापर्यंत पाच लाेकांचा बळी हत्तींनी घेतला. 

टॅग्स :FarmerशेतकरीGadchiroliगडचिरोलीCropपीक