शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

रानटी हत्तीची महाराष्ट्रातून तेलंगणात एंट्री, दोन दिवसांत दोन बळी, शेतकऱ्यांवर हल्ला

By संजय तिपाले | Updated: April 4, 2024 16:44 IST

सीमावर्ती भागात वनविभागाचा सतर्कतेचा इशारा

संजय तिपाले, गडचिरोली: छत्तीसगड राज्यातून गडचिरोलीत आलेल्या व कळपातून भरटकलेल्या एका रानटी हत्तीने ३ एप्रिल रोजी तेलंगणात एंट्री केली. तेथे या हत्तीने धुडगूस घातला असून सलग दोन दिवसांत दोन शेतकऱ्यांचा पायाखाली चिरडून बळी घेतल्याने भीतीचे वातावरण आहे. सीमावर्ती भागात वनविभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

ओडिशातून छत्तीसगडमार्गे गडचिरोलीत तीन ते साडेतीन वर्षांपूर्वी दोन डझन हत्तींनी शिरकाव केला.  गडचिरोलीतील  घनदाट जंगलात स्थिरावलेल्या हत्तींच्या उपद्रवाने शेतकरी हैराण आहेत. या हत्तींनी धान पिकांसह इतर पिकांचे नुकसान तर केलेच, पण २०२३ मध्ये चार व चालू वर्षी तीन महिन्यांतच तीन बळी घेतले. त्यामुळे भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, कळपातील भरकलेल्या एका हत्तीने ३ एप्रिल रोजी पहाटे मुलचेरा तालुक्यातील नागुलवाही गावाजवळून वाहणाऱ्या प्राणहिता नदी ओलांडून  तेलंगाणात प्रवेश केला.

तेलंगणाच्या कुमरमभीम जिल्ह्यातील  बुरेपल्ली (ता.चिंतलामानेपल्ली) येथे मिरचीत तोडणीच्या कामात व्यस्त असलेल्या अल्रीु शंकर (४५) या शेतकऱ्यावर हल्ला करत ठार केले.  अशातच   ४ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास आपल्या शेतात भात पिकाला पाणी घालत असलेल्या कारू पोशन्ना (५०)या शेतकऱ्यावर  रानटी हत्तीने हल्ला केला. त्यानंतर पायाखाली चिरडले. २४ तासांत रानटी हत्तीने दोन शेतकऱ्यांचा बळी घेतल्याने तेलंगणासह गडचिरोलीतील मुलचेरा तालुक्यात वनविभाग सतर्क झाला आहे.

ड्रोन कॅमेऱ्याद्वारे नजर

तेलंगणातील चिंतलामानेपल्ली तालुक्यातून या रानटी हत्तीने  बेजुर तालुक्यातील सुलुगुपल्ली परिसरात आपला मोर्चा वळविला आहे.   महाराष्ट्रात सुद्धा आलापल्ली वन विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि आरआरटी पथकाने    प्राणहिता नदीलगत ड्रोन कॅमेऱ्याद्वारे शोधमोहीम सुरु केली आहे. हत्तीच्या हालचाली टिपण्याचे काम सुरु आहे.

तेलंगणा राज्यात रानटी हत्तीने दोन शेतकऱ्यांचा बळी घेतला आहे . हे हत्ती  ट प्राणहिता नदी सीमावर्ती भागात आहेत. कदाचित ते पुन्हा महाराष्ट्राच्या हद्दीत प्रवेश करुन सीमावर्ती भागात येऊ शकतात. त्यामुळे गडअहेरी, चिंचगुंडी, वांगेपल्ली, कृष्णापूर, गेररा, महागाव येथे सतर्कता बाळगावी.- राजेश पिंपळकर, क्षेत्र सहाय्यक अधिकारी,  आलापल्ली ता. अहेरी

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीTelanganaतेलंगणा