शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीचे मंगळसूत्र मोडले, तीन दिवसांपासून उपाशी.. मुख्यमंत्री साहेब माझ्या मुलाला वाचवा....

By संजय तिपाले | Updated: January 31, 2025 17:37 IST

आदिवासी दाम्पत्याची व्यथा : मुलगा व्हेंटिलेटरवर, नागपूरमध्ये मृत्यूशी झुंज सुरु

गडचिरोली : भामरागड तालुक्यातील एका आदिवासी युवकाला ताप आल्याचे निमित्त झाले अन् प्रकृती खालावली. नागपूरमध्ये एका खासगी दवाखान्यात भरती केले. पत्नीचे मंगळसूत्र मोडले,  व्याजाने घेऊन पैसे भरले, पण आणखी एक लाख भरा म्हणून सांगितले जाते. तीन दिवसांपासून पती- पत्नी उपाशी आहेत. हतबल झालेल्या पित्याने मुलाला वाचविण्यासाठी ३१ जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून साहेब, तुम्हीच आमचे पालक, माझ्या मुलाला वाचवा... अशी विनवणी केली आहे.

सुनील रमेश पुंगाटी (१७,रा. हितापाडी ता. भामरागड) असे त्या युवकाचे नाव. २५ जानेवारीला सुनील यास ताप आला,त्यानंतर त्याची प्रकृती खालावली. ताप डोक्यात गेल्याने आजारी पडलेल्या सुनीलला घेऊन पिता रमेश रामा पुंगाटी नागपूरला गेले. मुलाला एका खासगी दवाखान्यात भरती केले. आतापर्यंत एक लाख रुपये उपचार खर्च आला. मुलाला वाचविण्यासाठी पत्नीचे मंगळसूत्र मोडले व व्याजानेही पैसे घेतले, पण आणखी एक लाख रुपये जमा करा म्हणून दवाखाना प्रशासनाने सांगितले. पैसे नसल्याने तीन दिवसांपासून हे दाम्पत्य उपाशी आहे. 

अशा परिस्थितीत पैसे कोठून आणायचे, असा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. निराश झालेल्या रमेश पुंगाटी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून पालकमंत्री या नात्याने मुलाला वाचवा, अशी विनंती केली आहे.

मुलगा वाचेल की नाही माहीत नाही...मुलगा व्हेंटिलेटरवर आहे, तो वाचेल की नाही माहीत नाही, अशा काळीज हेलावणाऱ्या शब्दांत रमेश पुंगाटी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. सध्या मुलावर उपचार सुरु असून आई- वडील त्याला वाचविण्यासाठी धडपडत आहेत.

दलालांचा सल्ला ऐकला, पण...मुलाला घेऊन नागपूरमध्ये वणवण भटकत असताना काही दलालांनी या रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला, तेथे स्वस्तात उपचार होतील, असे देखील सांगितले. प्रत्यक्षात कमी खर्चात उपचार होत नाहीत, असा उल्लेखही पत्रात करण्यात आला आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसGadchiroliगडचिरोलीHealthआरोग्यTrible Development Schemeआदिवासी विकास योजना