शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
6
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
7
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
8
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
9
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
10
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
11
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
12
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
13
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
14
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
15
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
16
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
17
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
18
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
19
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
20
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

घातक नकलीपेक्षा असलीच का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2022 05:00 IST

जिल्ह्यात नकली दारूचा पुरवठा होत असल्याचे वृत्त दोन दिवसांपूर्वी लोकमतने प्रकाशित केल्यानंतर अनेकांनी लोकमतकडे आपल्या भावना व्यक्त करून या वृत्ताला दुजोरा दिला. नकली दारूच्या आहारी गेलेल्या काही तरुणांचे आरोग्य बिघडून त्यांना कसे प्राण गमवावे लागले याचेही काही उदाहरण यानिमित्ताने समोर आले. यावरून दारूबंदीने केवळ अवैध विक्रेते आणि नकली दारू बनविणाऱ्यांचेच भले झाले आहे, सामान्य नागरिकांना फायदा होण्याऐवजी त्यांचे नुकसानच होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील दारूबंदीचा गैरफायदा घेत घातक अशी नकली दारू जिल्हावासीयांच्या गळी उतरविण्याची संधी कोणाला कशाला देता? त्यापेक्षा विष्फळ ठरलेली दारूबंदी दूर करून अधिकृतपणे दारूपुरवठा करा. त्यामुळे दारूचे आकर्षण कमी होण्यासोबत आरोग्यास अपायकारक नकली दारूही लोकांना प्यावी लागणार नाही, असे स्पष्ट मत विविध क्षेत्रांतील नागरिकांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केले. जिल्ह्यात नकली दारूचा पुरवठा होत असल्याचे वृत्त दोन दिवसांपूर्वी लोकमतने प्रकाशित केल्यानंतर अनेकांनी लोकमतकडे आपल्या भावना व्यक्त करून या वृत्ताला दुजोरा दिला. नकली दारूच्या आहारी गेलेल्या काही तरुणांचे आरोग्य बिघडून त्यांना कसे प्राण गमवावे लागले याचेही काही उदाहरण यानिमित्ताने समोर आले. यावरून दारूबंदीने केवळ अवैध विक्रेते आणि नकली दारू बनविणाऱ्यांचेच भले झाले आहे, सामान्य नागरिकांना फायदा होण्याऐवजी त्यांचे नुकसानच होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. वर्षभरात जिल्ह्यात काेट्यवधी रुपयांची दारू पाेलिसांकडून जप्त केली जाते. तरीही तस्करांकडून दारू आयातीचे प्रमाण कमी हाेताना दिसत नाही. पाेलीस २४ तास पाहारा देऊ शकत नसल्याचा गैरफायदा घेतला जात आहे.

बंदीऐवजी जनजागृतीवर भर हवा

मुळात दारू ही वाईट आहे तर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात आणि देशभरात ती विक्री करण्यावर, पिण्यावर मनाई का केली जात नाही? केवळ एका जिल्ह्यावर अशी बंदी घालणे हे अन्यायकारक आहे. दारू प्रमाणापेक्षा जास्त घेणे, त्याची सवय जडणे किंवा दारू नकली असणे यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. प्रमाणात घेतलेली दारू ही वाईट नाही.- ॲड. मृणाल मेश्राम

गेल्या ३० वर्षांपासून या जिल्ह्यात सुरू असलेली फसवी दारूबंदी अजून किती दिवस सामान्य नागरिकांना फसवत राहणार आहे? केवळ काही लोकांच्या फायद्यासाठी दारूबंदी करून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडविणे योग्य नाही. जिल्ह्यातील दारूबंदी केवळ कागदोपत्री आहे हे कोणालाही कळते, मग अशी निरर्थक दारूबंदी उठवत का नाही?- दिलीप मोटवानी

कोणत्याही गोष्टीला विरोध केला की त्याचे आकर्षण वाढते. गडचिरोलीत नेमके हेच होत आहे. मी दारूबंदी ठेवा किंवा उठवा यापेक्षा दारूबंदीचा एवढा बाऊ कशासाठी हे कळत नाही. दारू विक्री सुरू केली तर लोक कदाचित कमी प्रमाणात पितील. कारण त्याचे आकर्षण कमी होईल. शिवाय नकली दारूलाही आळा बसेल. वास्तविक निव्वळ बंदी लादल्याने लोक दारू पिणार नाही असे म्हणणे हास्यास्पद आहे. त्यापेक्षा लोकांमध्ये जनजागृती करणे महत्त्वाचे आहे.            - मनोज देवकुले

 

टॅग्स :liquor banदारूबंदी