शहरं
Join us  
Trending Stories
1
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
2
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
3
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
4
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
5
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
6
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
7
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
8
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
9
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
10
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
11
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
12
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
13
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
14
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!
15
दिवाळीनिमित्त राहुल गांधी पोहोचले मिठाईच्या दुकानात, स्वत: बनवली इमरती आणि बेसनाचे लाडू
16
भोजपुरी स्टार पवन सिंहची पत्नी ज्योती यांनी भरला नामांकन अर्ज, कुठल्या पक्षाकडून लढणार?
17
EDला सापडले २५० पासपोर्ट, ७ पाकिस्तानी नागरिकांचा शोध सुरू, बंगाल कनेक्शन समोर   
18
"गेल्या १० वर्षात साबणाला हातही लावला नाही"; बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं 'बाथरूम सीक्रेट'
19
१५ वर्षांनी लहान पुतण्यावर जडला २ मुलांच्या आईचा जीव; नकार देताच पोलिसांसमोर भयंकर कृत्य
20
दिवाळीच्या फटाक्यांमुळे कार किंवा बाइकला आग लागली तर इन्शुरन्स क्लेम करू शकता का? जाणून घ्या

ही कसली नोकरी? १२ महिने २४ तास अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2024 15:20 IST

Gadchiroli : अग्निशमन विभागावर पावसाळ्यातही कामांचा बोझा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : अग्निशमन विभागाला वर्षातून अगदी मोजके दिवस काम करावे लागते. मात्र आगीची घटना कधी घडेल, हे सांगता येत नाही. त्यासाठी २४ तास अलर्ट राहावे लागते. विशेष म्हणजे, पावसाळ्याच्या दिवसांतही या विभागातील कर्मचाऱ्यांना अलर्ट ठेवले जाते.

पावसाळ्यात आगीच्या घटना फार कमी घडतात. त्यामुळे या विभागावर पावसाळ्यात इतर कामे सोपविली जातात. यामध्ये प्रामुख्याने आपत्ती व्यवस्थापनाच्या कामांचा समावेश होते. पावसाळ्याच्या दिवसांत झाडे पडून मार्ग बंद पडल्याच्या घटना घडतात. अशावेळी अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांना बोलावून ही समस्या दूर करावी लागते. केवळ एक चालक व एक फायरमन यांना अग्निशमनच्या कर्तव्यावर अलर्ट ठेवले जाते. इतर कर्मचारी इतर काम करीत असतात.

अग्निशमन विभाग करतोय ही सुद्धा कामे

  • लाडक्या बहिणींना मदत : अग्निशमन विभागातील कंत्राटी कर्मचारी आता लाडकी बहिण योजनेचे अर्ज भरून देण्यास मदत करीत आहेत.
  • आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी : पावसाळ्यात आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारीसुद्धा या कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. पावसाळ्यात ही कामे केली जात आहेत.
  • हेलिपॅडवर सेवा : पोलिस मुख्यालयाच्या हेलिपॅडवर मंत्र्यांचे हेलिकॉप्टरने ये-जा सुरू असते. टेकऑफ व लॅन्डिंग करतेवेळी अग्निशमन वाहन तिथे ठेवले जाते.
  • झाडे कटाईची कामे : पावसाळ्याच्या दिवसांत झाड पडून एखादा रोड बंद झाला असल्यास तेथील झाड उचलण्याची जबाबदारी अग्निशमन विभाग पार पाडते.

नऊ कर्मचाऱ्यांची फौजएक सहाय्यक अग्निशमन अधिकारी, दोन चालक व सहा फायरमन अशी एकूण नऊ कर्मचाऱ्यांची फौज गडचिरोली येथे कार्यरत आहेत.

अग्निशमन विभागाने वर्षभरात १५ आगी विझवल्यागडचिरोली अग्निशमन विभागाने वर्षभराच्या कालावधीत १५ आगी विझवल्या आहेत. यामुळे लाखो रूपयांचे नुकसान टळले.

वर्षाचे १२ महिने २४ तास अलर्टवर्षाचे १२ महिने व २४ तास अलर्ट राहावे लागते. काम नाहीच्या बरोबर असले तरी रात्रंदिवस चालक व फायरमनची ड्युटी लावली जाते. आगीची घटना कधी घडेल हे सांगता येत नाही.

उन्हाळ्यात आगीच्या घटना जास्तउन्हाळ्याच्या कालावधीत आग लागण्याच्या घटना गडचिरोली जिल्ह्यात घडतात. त्यामुळे अलर्ट राहावे लागते.

संपूर्ण तालुक्याचा भारगडचिरोली शहरातील अग्निशमन यंत्रणेवर संपूर्ण तालुक्याचा भार सोपविण्यात आला आहे. कधी-कधी धानोरा, चामोर्शी व आरमोरी तालुक्यातसुद्धा घटना घडतात. या तालुक्यातील आग विझवण्यासाठी गडचिरोली अग्निशमन दलाला जावे लागते, हे विशेष.

अग्निशमन विभागाला आग विझवण्यासोबतच इतर कामेसुद्धा करावी लागतात. सध्या पावसाळ्याच्या दिवसांत आपत्ती व्यवस्थापनाची कामे करण्यात अग्निशमन विभागाचे अधिकारी व्यस्त आहेत. - अनिल गोवर्धन, सहायक अग्निशमन अधिकारी 

टॅग्स :Fire Brigadeअग्निशमन दलGadchiroliगडचिरोली