आॅनलाईन लोकमतगडचिरोली : सरकारकडून विकासाचे चित्र रंगविल्या जात आहे. मात्र या विकासाचे प्रत्यक्ष लाभ सामान्य जनतेला होत नसून काही निवडक कंपन्या व नागरिकांचा होत आहे. हा विकास देशाच्या काय कामाचा, असा प्रश्न डॉ. सलीम खान यांनी उपस्थित केला आहे.जमाअत-ए-इस्लामी हिंद, महाराष्टÑ संघटनेच्या वतीने गडचिरोली येथील आशीर्वाद मंगल कार्यालयात सोमवारी सायंकाळी ‘इस्लाम शांती विकास व मुक्तीसाठी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यापूर्वी ते पत्रकारांशी चर्चा करताना बोलत होते. डॉ. सलीम खान पुढे म्हणाले, देशाने अनेक क्षेत्रामध्ये प्रगती केली आहे. मात्र स्वातंत्र्य सैनिकांना अपेक्षित हवा होता. तसा विकास झाला नाही. राजकीय पक्ष विकास या शब्दाचा वापर करण्यात व्यस्त आहेत. सध्याच्या सरकारच्या काळात समाजात तेढ, गुन्हे, उपासमारी, शेतकरी आत्महत्या वाढल्याचे चित्र दिसत आहे. सामान्य जनतेच्या मनात निर्माण झालेली भीती, निराशा आणि द्वेशभावना यांचा विनाश करण्यासाठी जनजागरण केले जाईल, यासाठी १२ ते २१ जानेवारी या कालावधीत ‘इस्लाम शांती विकास व मुक्तीसाठी’ हे अभियान राज्यभरात राबवून विविध ठिकाणी कार्यक्रम घेतले जात आहेत. मुस्लिम समाजाबद्दल जनसामान्यांमध्ये गैरसमज निर्माण झाला आहे. हा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न या कार्यक्रमांमधून केला जाईल. आजपर्यंत झालेल्या कार्यक्रमांची वेगवेगळ्या धर्मातील नागरिकांनी कौतुक केले आहे. आलापल्ली येथे मंगळवारी सायंकाळी ७ वाजता अशाच प्रकारचा कार्यक्रम आयोजित केला आहे, असे सांगितले. यावेळी प्रा. अयुब खान, जमाअत-ए-इस्लामी हिंद, महाराष्टÑचे जिल्हा संघटक रफिक कुरेशी उपस्थित होते.
निवडक लोकांचा विकास काय कामाचा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 23:13 IST
सरकारकडून विकासाचे चित्र रंगविल्या जात आहे. मात्र या विकासाचे प्रत्यक्ष लाभ सामान्य जनतेला होत नसून काही निवडक कंपन्या व नागरिकांचा होत आहे.
निवडक लोकांचा विकास काय कामाचा?
ठळक मुद्देसलीम खान यांचा सवाल : जमात-ए-इस्लामी हिंदतर्फे जनजागृती कार्यक्रम