शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

चकमकीत ठार झालेले दोघे नक्षलवादी नव्हते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2019 05:52 IST

आदिवासींचे निवेदन; पोलीस मात्र ठाम

भामरागड (गडचिरोली) : भामरागड तालुक्याच्या छत्तीसगड सीमेवरील अबुझमाडच्या जंगलालगत गेल्या ३० नोव्हेंबर रोजी झालेल्या चकमकीत दोन नक्षलवाद्यांना पोलिसांनी कंठस्रान घातले, परंतु ते नक्षलवादी नव्हते तर शेतकरी होते, असा दावा करत नेलगुंडा परिसरातील शंभरावर नागरिकांनी धोडराज पोलीस मदत केंद्रात जाऊन तहसीलदारांना निवेदन दिले. मात्र, पोलिसांनी नातेवाईकांचा हवाला देत ते दोघेही नक्षलवादीच होते असा दावा केला आहे.

गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार ठार झालेले प्रकाश चुक्कू मुहादा व राजू दस्सा पुसाली हे दोघेही नेलगुंडा येथील रहिवासी असून शेतकरी होते. गोरग्याचे झाड पाहण्यासाठी ते जंगलात गेले होते. तेथून परत येत असताना मोरोमेठ्ठा गावाजवळ पोलिसांनी त्यांना गाठून मारहाण करत नक्षलवाद्यांचा ठावठिकाणा सांगण्यास बजावले. भीतीमुळे दोघांनी ते ठिकाण दाखविले. तिथे नक्षलवादी आणि पोलिसांची चकमक उडाली. दुसºया दिवशी दोघांना नक्षलवादी ठरवत ठार मारण्यात आले. मंगळवारी रात्रीही निवेदन देण्यासाठी आलेले सर्व नागरिक पोलीस मदत केंद्रातच मुक्कामी होते. रात्र झाल्यामुळे त्यांनी मुक्काम केला असून त्यांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था पोलीस विभागानेच केल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले. बुधवारी सकाळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोहीतकुमार गर्ग यांनी धोडराज पोलीस मदत केंद्रात जाऊन गावकऱ्यांची भेट घेतली. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. त्यात काय सत्य आहे ते स्पष्ट होईलचअसे सांगून त्यांनी लोकांची समजूत काढली.स्वार्थासाठी दिशाभूलया प्रकरणी पोलिसांनी मृतांचे नातेवाईक आणि आत्मसमर्पित नक्षलवाद्यांचा हवाला देत ते मृत नक्षलवादीच होते, असा दावा केला आहे. नक्षलवादी आपल्या स्वार्थासाठी नागरिकांची दिशाभूल करून प्रशासनावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत असल्याचे पोलीस विभागाकडून सांगण्यात आले. 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोलीnaxaliteनक्षलवादीPoliceपोलिस