गावाबाहेरील विहीर भागवतेय काेपेलावासीयांची तहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:35 AM2021-05-15T04:35:20+5:302021-05-15T04:35:20+5:30

सिराेंचा तालुका मुख्यालयापासून ७० किमी अंतरावर काेपेला हे गाव आहे. येथे हातपंप व विहिरी आहेत. परंतु उन्हाळ्यामुळे पाणीपातळी खालावून ...

The well outside the village quenches the thirst of the villagers | गावाबाहेरील विहीर भागवतेय काेपेलावासीयांची तहान

गावाबाहेरील विहीर भागवतेय काेपेलावासीयांची तहान

Next

सिराेंचा तालुका मुख्यालयापासून ७० किमी अंतरावर काेपेला हे गाव आहे. येथे हातपंप व विहिरी आहेत. परंतु उन्हाळ्यामुळे पाणीपातळी खालावून सध्या हे स्त्राेत काेरडे पडले आहेत. दरवर्षी गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण हाेते. त्यामुळे नागरिकांना भटकंती करावी लागते. यावर्षीसुद्धा गावात पाण्याची टंचाई निर्माण झाली. त्यामुळे नागरिकांच्या मागणीनुसार काेपेला येथे ५ टक्के अबंध निधीतून गावाबाहेर ५०० मीटर अंतरावर असलेल्या विहिरीवर नवीन माेटार पंप बसवून गावातील तिन्ही वाॅर्डात पाईपलाईन टाकून पाणी पाेहाेचविण्यात आले. ग्रामपंचायतीच्या पुढाकारामुळे गावातील पाणीटंचाईवर मात करण्यास मदत मिळाली आहे. ७ मे राेजी सदर याेजनेची सुरुवात करण्यात आली हाेती. पाणीपुरवठा याेजना कार्यान्वीत करण्यासाठी सरपंच सुरेश जनगाम, विनाेद पेद्द्याला, रमेश मिच्चा, सुरेश मडे, सडवली जनगाम, समय्या काेंडागाेर्ला, जी.एल काका, सचिव डी.ए. वायबसे यांचे सहकार्य लाभले. याशिवाय गावातील नागरिकांनी श्रमदान करून विद्युत खांब उभे करून वीज कर्मचाऱ्यांना सहकार्य केले.

===Photopath===

140521\14gad_5_14052021_30.jpg

===Caption===

काेपेला येथे पाणीपुरवठ्यासाठी कार्यान्वीत केलेली पाईपलाईन.

Web Title: The well outside the village quenches the thirst of the villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.