मागील वर्षी सुद्धा कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे पाच महिने आठवडी बाजारावर बंदी होते. यामुळे आठवडी बाजारावर अवलंबून असणाऱ्या छोटे-मोठे व्यावसायिकांना चांगलाच आर्थिक फटका सहन करावा लागला होता. आठवडी बाजार सुरू झाल्यानंतर त्यांची आर्थिक स्थिती रुळावर येण्यास सुरुवात झाली हाेती. मात्र पुन्हा आठवडी बाजारावर बंदी आणल्यामुळे राेजगार हिरावून त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. दैनिक सुरू असणाऱ्या शहरातील माेठ्या दुकानात असणारी वर्दळ चालते. परंतु आठवडी बाजारात असणारी वर्दळ चालत नाही काय? असा प्रश्न आठवडी बाजारावर अवलंबून असणाऱ्या व्यावसायिकांनी केला आहे.
काेरची तालुक्यातील दुर्गम भागातील नागरिक आठवडी बाजाराच्या निमित्ताने जवळपासच्या माेठ्या गावात जातात. त्या दिवशी भाजीपालासह इतर जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करतात. मात्र आठवडी बाजार नसल्याने त्यांचीही अडचण हाेत आहेत.