शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांना पाहिजे तोच निर्णय ते घेतात, फक्त दाखवताना तो सामुहिक दाखवतात"
2
‘१५ सेकंदांसाठी पोलीस हटवा, कळणारही नाही की…’ नवनीत राणांचं ओवेसी बंधूंना आव्हान, एमआयएम संतप्त
3
'महाराष्ट्रात कंपनी उघडी ठेवायची असेल तर..; गुजराती कंपन्यांना उद्धव ठाकरेंचा इशारा
4
भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचं खुलं पत्र; अभिनेत्री रेणुका शहाणेंना सुनावले खडे बोल
5
Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरणीचं सत्र सुरूच; Hero Motocorp मध्ये तेजी, डॉ. रेड्डीज घसरला
6
सोनालीच्या जगण्याची होती ३० टक्के शक्यता; मृत्युच्या दारातून परतलेल्या अभिनेत्रीने सांगितला कॅन्सरचा प्रवास
7
गुणरत्न सदावर्ते दाम्पत्याला सहकार खात्याचा दणका; एसटी बँकेवरील संचालकपद रद्द
8
Paytm Share Price : आपटून 'ऑल टाईम लो'वर Paytm चा शेअर; IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांवर डोक्याला हात लावायची वेळ
9
मध्यंतर...पिक्चर अभी बाकी है दौस्त! घड्याळाचे काटे पवारांकडून ठाकरे-शिंदेंकडे वळले, शहरी मतदारांवर भिस्त
10
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
11
संपादकीय: ऋण काढून सण! बचत घसरली, आता कोण वाचविणार...
12
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
13
भाजपाची चौथ्या-पाचव्या टप्प्यासाठी मोठी तयारी! जे.पी. नड्डा आज निवडणुकीचा आढावा घेणार
14
आजचे राशीभविष्य - ०९ मे २०२४ : आर्थिक फायदा संभवतो,विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील
15
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
16
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
17
...म्हणून दक्षिण मुंबईची जागा लढवली नाही; मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा खुलासा
18
मेलो तरी चालेल; धनुष्य-बाण, हात, कमळावर लढणार नाही; महादेव जानकर यांचे महत्वाचे वक्तव्य
19
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्युत्तर...
20
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका

गडचिरोलीत आजपासून आठवडाभर ‘जनता कर्फ्यू’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 5:00 AM

देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा येथील ५७ वर्षीय कोरोनाबाधित आरोग्य कर्मचाºयाचा मृत्यू झाला. ते चामोर्शी तालुक्यात एमपीडब्लू म्हणून कार्यरत होते. ५६ जण कोरोनामुक्तही झाल्याची नोंद आरोग्य विभागाने घेतली. यामुळे जिल्ह्यातील क्रियाशिल कोरोनाबाधितांची संख्या ४९० झाली आहे. आतापर्यंत एकूण बाधितांचा आकडा प्रथमच दोन हजारांच्या टप्प्यावर गेला. २ हजार ८६ बाधितांपैकी १ हजार ५८२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र १४ जणांना जीवही गमवावा लागला.

ठळक मुद्देआतापर्यंत १४ कोरोनाबळी : नवीन ९३ बाधितांची भर, तर ५६ रुग्ण झाले कोरोनामुक्त

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली शहरातील कोरोनाच्या प्रसाराला आवर घालण्यासाठी व्यापारी आणि प्रमुख राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार पुकारलेल्या आठवडाभराच्या ‘जनता कर्फ्यू’ला बुधवार (दि.२३) पासून सुरूवात होत आहे. त्यामुळे मंगळवारी शहरातील मार्केट विविध वस्तूंच्या खरेदीसाठी गजबजून गेले होते. दरम्यान एका आरोग्य कर्मचाºयाचा मृत्यू होण्यासोबतच ९३ नवीन रुग्णांची बुधवारी भर पडली आहे.देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा येथील ५७ वर्षीय कोरोनाबाधित आरोग्य कर्मचाºयाचा मृत्यू झाला. ते चामोर्शी तालुक्यात एमपीडब्लू म्हणून कार्यरत होते. ५६ जण कोरोनामुक्तही झाल्याची नोंद आरोग्य विभागाने घेतली. यामुळे जिल्ह्यातील क्रियाशिल कोरोनाबाधितांची संख्या ४९० झाली आहे. आतापर्यंत एकूण बाधितांचा आकडा प्रथमच दोन हजारांच्या टप्प्यावर गेला. २ हजार ८६ बाधितांपैकी १ हजार ५८२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र १४ जणांना जीवही गमवावा लागला.नवीन ९३ बाधितांमध्ये गडचिरोली शहरातील ३३ जण आहेत. त्यामध्ये आयटीआय चौक ४, नवेगाव कॉम्प्लेक्स २, जिल्हा परिषद कर्मचारी ७, सोनापूर कॉप्लेक्स १, विवेकानंदनगर ३, चामोर्शी रस्ता १, पोर्ला १, कन्नमवार वार्ड १, सर्वोदय वार्ड २, पोलीस स्टेशन १, इंदिरा नगर १, गणेश कॉलनी १, अयोध्यानगर १, एसआरपीएफ ४, हनुमान वार्ड १ व चंद्रपूर जिल्ह्यातील २ जणांचा समावेश आहे. अहेरीतील १४ जण आहेत. त्यात अहेरी शहर ५, आलापल्ली २, महागाव ५, बोरी १, चेरपल्ली १ जण याप्रमाणे आहेत. देसाईगंज तालुक्यातील ६ जणांमध्ये आमगाव १ आणि देसाईगंज शहरातील ५ जणांचा समावेश आहे. धानोरा तालुक्यातील दोघांमध्ये शहरातील १ व मिछगावमधील १, आरमोरी तालुक्याच्या ११ मध्ये शहरातील ५, डोंगरगाव ३, आंबेशिवणी १, अरसोडा १, सिर्सी १ यांचा समावेश आहे. याशिवाय सिरोंचा ३, कोरची ६, कुरखेडा १०, चामोर्शी १, एटापल्ली ३, भामरागड २ तथा मुलचेरा येथील २ जणांचा समावेश आहे.खरेदीसाठी झाली मार्केटमध्ये गर्दीआठवडाभराच्या जनता कर्फ्यूमध्ये सर्व प्रकारच्या वस्तूंसह भाजी विक्रीही बंद राहणार असल्याचे सांगितल्यामुळे शहरवासियांनी मंगळवारी बाजारात चांगलीच गर्दी केली होती. विविध वस्तूंच्या खरेदीसह गुजरीच्या भाजी मार्केटमध्येही संध्याकाळी अंधार पडेपर्यंत वर्दळ कायम होती. संध्याकाळी ७ वाजता शहर पोलिसांनी सायरन वाजवत चकरा मारल्यामुळे मार्केटमधील दुकानदारांनी आवरते घेतले.जि.प.अध्यक्षांवर नागपुरात उपचारजिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर त्यांना आधी गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केले होते. पण श्वास घेण्यास त्रास जाणवू लागल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून अलिकडे संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या